..तर तुला भारतात पायही ठेऊ देणार नाही; बीसीसीआयची बड्या क्रिकेटपटूला थेट धमकी

मुंबई। दक्षिण आफ्रिका संघाचा माजी क्रिकेटपटू हर्शल गिब्ज याने बीसीसीआय (BCCI) त्याला धमकी देत असल्याचा आरोप केला आहे. भारतामध्ये ट्वेन्टी-२० लीग खेळणे तर दूरच, पण तुला आमच्या देशात पायही ठेवू देणार नाही, असे बीसीसीआयने गिब्ज धमकी दिली आहे.

त्यामुळे आता सर्वत्र खळबळ उडाली आहे. गिब्जच्या म्हणण्यानुसार भारतीय क्रिकेट बोर्ड त्याला काश्मीर प्रीमियर लीगमध्ये खेळण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. या संदर्भात एक पोस्ट त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली आहे.

पोस्टमध्ये गिब्स म्हणाला आहे की, ” बीसीसीआय माझ्याबरोबर असं राजकारण का करत आहे माहिती नाही. मी काश्मीर प्रीमिअर लीगमध्ये खेळण्यासाठी प्रयत्न करत होतो. पण बीसीसीआयने मला परवानगी दिली नाही.

तसेच मी असे केल्यास मला भारतातील कोणत्याही क्रिकेट संबंधी कार्यक्रमात, स्पर्धांत सहभाग घेता येणार नाही. अशी धमकीही दिली जात आहे. सध्या KPL साठी हर्शल गिब्ज, मोंटी पानेसर, तिलकरत्ने दिलशान या खेळांडूंची निवड झाली आहे.

त्याचबरोबर भारतामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी तुला पायही ठेवू देणार नाही, अशी धमकीही मला बीसीसीआयने दिली आहे. बीसीसीआय नेमकं असं का करत आहे, हे मला अजूनही समजलेले नाही.” असं गिब्स म्हणाला आहे. याआधी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रशीद लतीफने देखील BCCI वर असेच काहीसे आरोप केले होते.

त्यांच्या मते BCCI जे माजी क्रिकेटपटू KPL मध्ये सहभाग घेतील त्यांना भारतीय क्रिकेटमधील कोणत्याच कार्यक्रमात सहभाग घेता येणार नाही. व आता त्याच्यानंतर गिब्जने आरोप केले आहेत. गिब्जवर एकतर मॅच फिक्सिंगचे आरोप होते.

त्याचबरोबर ही काश्मीर प्रीमिअर लीग पाकिस्तान आयोजित करत आहे. ही लीग आयोजित करत काश्मीर हा आमचा प्रांत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करू पाहत आहे. त्यामुळे या लीगमध्ये जर खेळला तर तुला भारतात क्रिकेट खेळण्यासाठी पायही ठेवू देणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

काश्मीर प्रीमियर लीगमध्ये 6 संघ खेळमार आहेत. ओवरसीजन वॉरियर्स, मुजफ्फराबाद टायगर्स, रावलकोट हाक्स, बाघ स्टालियंस, मीरपुर रॉयल्स आणि कोटली लायन्स अशी या संघाची नावं आहेत. मात्र जर आता गिब्ज या लीगमध्ये खेळाला तर त्याला भारतात पायही ठेऊ देणार नाही असे BCCI ने धमकी दिल्याचा आरोप गिब्जने केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
प्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरी करणार लग्न? ‘असा’ हवा आहे मुलगा
“नरेंद्र मोदी मला थांबून म्हणतात, कैसे हो भाई, यालाच म्हणतात सत्ता, पॉवर”
‘पूरग्रस्त भागात ३ दिवसात ११३७ किलोमीटर फिरलो, आता राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार’
..वेळ आली तर सेनाभवन फोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांचे वादग्रस्त वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.