“…म्हणून आज मला भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय”‘तारक मेहता…’फेम बबिता भडकली

मुंबई। ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय कॉमेडी शोमधील टप्पू व सर्वांची आवडती बबिताजी यांच्याबद्दल शॉकिंग माहिती सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. बबिताजी म्हणजेच मुनमुन दत्ता एका व्यक्तीला डेट करत आहे. ही व्यक्ती म्हणजे राज अनादकत आहे.

सध्या हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या असून सर्वांनाच धक्का बसला आहे. या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा रंगताच सोशल मीडियावर या दोघांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे. त्यांच्यावर अनेक अश्लिल कमेंट्स केल्या जात आहेत.

व आता याच कमेंट्स व ट्रॉलर्सला कंटाळून मुनमुन दत्ता म्हणजेच बबिताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. तिने सोशल मीडियावर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्यात ती प्रचंड संतापली आहे.

मुनमुनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या दोन पोस्ट शेअर केल्या असून तिने राग व्यक्त केला आहे. पहिली पोस्ट शेअर करत ती म्हणाली आहे की “कोणत्याही व्यक्तीच्या खासगी आयुष्यावर काल्पनिक बातमी देण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले आहेत? तुमच्या या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या आयुष्यावर जो काही परिणाम होतो किंवा बदल होतो त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारणार आहात का?

पुढे ती म्हणाली एखाद्या स्त्रीने नुकताच तिचा मुलगा किंवा मग प्रियकर गमावला असेल तरी तुम्ही त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढतात, हे सगळं फक्त तुम्ही तुमच्या टीआरपीसाठी करता.

तसेच पाहिजे तसे वृत्त किंवा हवं ते हेडिंग देत तुम्ही कोणाच्या ही प्रतिष्ठेला धक्का देऊ शकतात, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्यानंतर तुम्ही या सगळ्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि जर तुम्ही ते करू शकत नसाल तर तुम्हाला स्वत: ची लाज वाटली पाहिजे,” अशा शब्दात मुनमुनने राग व्यक्त केला आहे.

दुसऱ्या पोस्टमध्ये मुनमुन म्हणाली, ‘मी तुमच्या सगळ्यांकडून खूप चांगल्या अपेक्षा ठेवल्या होत्या. मात्र, कमेंट सेक्शनमध्ये जो तुम्ही अश्लीलपणा केला आहे, एवढंच नाही तर आपला समाज कसा पाठी जाऊ शकतो हे शिकलेल्या लोकांनी देखील दाखवलं आहे.

पुढे ती म्हणाली तुमच्या विनोदासाठी स्त्रीयांना नेहमीच त्यांच्या वयावरून, आईला लाजवलं जातं. तुमच्या या विनोदाचा समोरच्या व्यक्तीवर काही परिणाम होतो किंवा नाही याचं तुम्हाला काही वाटतं नाही. १३ वर्षांपासून तुमचे मनोरंजन करत आहे आणि माझी प्रतिष्ठा उद्वस्त करण्यासाठी तुम्हाला १३ मिनिटे लागली नाहीत.

यामुळे पुढच्यावेळी जर कोणी नैराश्येचा सामना करत असेल किंवा स्वत: चा जीव घेण्याचा प्रयत्न करत असेल तर थांबून जरा विचार करा, हे सगळं तुमच्यामुळे तर झालेल नाही ना. आज मला भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय,’ असं म्हणत तिने आपला राग व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
मोदी शहांचे पुन्हा धक्कातंत्र! भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री; जाणून घ्या कोण आहेत भूपेंद्र पटेल 
VIDEO: नाकात नथ, अंगावर नऊवारी साडी; गणपती बाप्पाच्या आगमानानिमित्त राजेश्वरी खरातचे खास नृत्य 
मोठी बातमी; लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर बांधणार हाती घड्याळ; लवकरच करणार पक्षप्रवेश 
“एवढ्या रात्री ती काय करत होती? तिचे कपडे चुकले असतील! सगळं तिचंच चुकलं असणार”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.