…म्हणून पाकिस्तान दाऊद, हाफिज, मसूदच्या आर्थिक नाड्या आवळणार

 

नवी दिल्ली | फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) या आंतरराष्ट्रीय यंत्रणेच्या धसक्यामुळे पाकिस्तानने ८८ दहशतवादी संघटना, त्यांचे प्रमुख आणि गुन्हेगारांवर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहे.

पाकिस्तानने लावलेल्या निर्बंधनामुळे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद आणि जैश-ए-मोहम्मदचा मसूद अजहर यांच्या सर्व मालमत्ता जप्त केल्या जाणार आहे.

पॅरिसमध्ये असलेल्या एफएटीएफ ही यंत्रणा दहशदवादासाठी पुरवला जाणारा निधी आणि मनी लॉंड्रिंग रोखण्यासाठी सक्रिय आहे. या यंत्रणेने आधीच पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले आहे. त्यामुळे ही कारवाई केली असल्याचे बोलले जात आहे.

तसेच दहशतवादी संघटनांवर आता कारवाई केली नाही तर त्या यंत्रणेकडून पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याची शक्यता होती. त्यामुळे पाकिस्तानने ही कारवाई केली असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, भारतीय तपास आणि सुरक्षा यंत्रणांना चुकवण्यासाठी दाऊद इब्राहिमने पाकिस्तानात आश्रय घेतला आहे. तर हाफीज हा मुंबईत झालेल्या २६/११ या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.