..त्यामुळे सुशांतचे शव रुग्णवाहिकेतून घेऊन जाणाऱ्या ड्रायव्हरला येत आहेत धमकीचे फोन

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपुतचे शव ज्या रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते त्या रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरला वारंवार धमकीचे फोन येत आहेत. त्याने बुधवारी हा खुलासा केला आहे.

त्याचे म्हणणे आहे की, सुशांतचे चाहते मला वारंवार फोन करून धमकी देत आहेत. ते माझ्यावर आरोप लावत आहेत की, मी सुशांतचा रुग्णवाहिकेत गळा दाबून खून केला आहे.

ड्रायव्हर विशाल बंदगार यांनी सांगितले की, मी आणि माझा भाऊ शहरातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिकेची सेवा पुरवतो. पण जेव्हापासून आम्ही सुशांतचे शव नेले होते तेव्हापासून आम्हाला धमकीचे फोन येत आहेत.

विशालने सांगितले की, जेव्हा पण ते फोन करतात तेव्हा अभद्र भाषेचा वापर करतात आणि बोलतात की, सुशांत रुग्णवाहिकेत असताना जिवंत होता तुम्ही त्याला गळा दाबून मारले आहे. ईश्वर तुम्हाला त्याची सजा देणार.

दरम्यान, बंदगार बंधूंच्या चार रुग्णवाहिका आहेत. त्या चारही रुग्णवाहिकांवर त्यांचा फोन नंबर लिहिलेला आहे त्यामुळे त्यांना देशभरातून धमकीचे फोन येत आहेत. त्यांनी पोलिसांना यासंदर्भात तक्रार केली असुन पोलीस लवकरच यावर कारवाई करणार आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.