…म्हणून कोरोना लसीची गरजच पडणार नाही; ऑक्सफर्ड मधील तज्ज्ञांचा दावा

लंडन | कोरोना व्हायरसवर लस कधी येईल याची वाट आज प्रत्येक नागरिक बघत आहे. कारण या महामारीमुळे लाखो लोकांनी आपले जीव गमावले आहेत. मात्र अशा परिस्थितीत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी मोठा दावा केला आहे.

मात्र बहुतेकांना कोरोना लसीची गरजच पडणार नाही, तर कोरोना हा सामान्य फ्लूप्रमाणे होईल. लोकांच्या आयुष्याचा एक भाग होईल, असा दावा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी केला आहे.

जे वृद्ध, कमजोर नाहीत आणि त्यांना इतर कोणता आजार नाही, अशा लोकांना कोरोना व्हायरसला घाबरण्याची काहीच गरज नाही. इन्फ्लूएंझापेक्षादेखील या व्हायरसमुळे कमी लोकांचा मृत्यू होईल अशी मला आशा आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका आणि एपिडेमोलॉजिस्ट सुनेत्रा गुप्ता यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले आहे.

पुढे त्यांनी असेही सांगितले की, कोरोना व्हायरसची लस तयार करणे सोप आहे. लवकरच लस चांगली काम करत आहे, याचे पुरावे आपल्याकडे असतील.

मात्र जेव्हा लस येईल तेव्हादेखील ती सर्वप्रथम कमजोर आणि जास्त धोका असलेल्या लोकांना दिली जाईल. बाकी लोकांना व्हायरसबाबत चिंता करण्याची गरज नाही. कोरोना व्हायरसची महासाथ नैसर्गिकरित्या संपेल.

दरम्यान कोरोनाला रोखण्यासाठी सध्या बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र तो पुरेसा नसल्याचे मतही गुप्ता यांनी व्यक्त केलं आहे.
लॉकडाऊन हा कोरोनाला रोखण्याचा मार्ग आहे, यामुळे आपण कोरोनाला दीर्घकाळ नाही रोखू शकत.

काही देशांनी यशस्वीरित्या लॉकडाऊन हाताळले, मात्र आता त्या देशांमध्ये कोरोना व्हायरसचे संक्रमण पुन्हा वाढू लागलं आहे. याला कोरोना व्हायरसची दुसरी लहर म्हटलं जात आहे, असेही सूनित्रा गुप्ता यांनी सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.