“…तर सचिन वाझे यांना जामीन मिळू शकतो”- ऍड असीम सरोदे

पुणे | उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. पोलिस तपासात ही कार मनसुख हिरेन या व्यक्तीची असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यानंतर काही दिवसांनी मनसुख हिरेनचा मृतदेह ब्रांद्रा येथील खाडीत सापडला होता. या प्रकरणात इन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचं नाव समोर आलं आहे.

इन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांना काल (दि. १४) एनआयएने २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पुण्यातील वकील असीम सरोदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सरोदे यांनी या प्रकरणाबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

घराबाहेर स्फोटकं सापडल्या प्रकरणी अंबानी यांनी तक्रार दाखल केली आहे का?, पोलिसांनी अंबानी यांचं स्टेटमेंट घेतलं आहे का किंवा त्यांनीच स्टेटमेंट दिलं आहे का?, हे लोकांना जाणून घ्यायचं आहे. ज्यांच्या विरोधात कट रचला गेलाय त्यांची स्टेटमेंटचं नाहीये. त्यामूळे या प्रकरणात राजकारण होतं आहे. सचिन वाझेंनी चुकीचं काम केलं असेल तर त्यांना शिक्षा मिळेलच. असं असीम सरोदे म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले की, सचिन वाझेंची नार्को टेस्ट करण्याची काही नेत्यांनी मागणी केली आहे. नार्को टेस्ट करणे बेकायदेशीर आहे. मानवी हक्क आयोगाने नार्को टेस्ट बाबत मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. त्यामूळे नार्को टेस्ट होऊ शकत नाही. नेत्यांनी चुकीची मागणी करून लोकांना अज्ञानाकडे नेऊ नये. सचिन वाझे तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार असल्याचं कोर्टाला वाटलं तर त्यांना जामीन मिळू शकतो. असंही वकील सरोदे म्हणाले आहेत.

कोण आहेत असीम सरोदे…

असीम सरोदे हे पुण्यातील वकिल आहेत. मानवी हक्कांसाठी काम करणारे वकील म्हणून त्यांची ओळख आहे. ‘बलात्काराची प्रकरणे हाताळताना’, ‘कौटुंबिक हिंसाचार आणि कायदा,’ ‘पॉईंट ऑफ व्ह्यू’ ही पुस्तके सरोदे यांनी लिहिली आहेत.

भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात अंजल दमानिया यांचे असीम सरोदे हे वकील होते. ईडीने सरोदे यांच्याकडून या प्रकरणाच्या माहितींच्या कागदपत्रांची झेरॉक्स घेतले होते. त्या झेरॉक्सचे पैसे ईडीने दिले नसल्याने असीम सरोदे यांनी ईडीला नोटिस पाठवली होती.

महत्वाच्या बातम्या-
खुशखबर! देशातील रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारचे मोबाइल App लाँच; वाचा सविस्तर
भाजपला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी कोणासोबतही युती करण्याची तयारी- इम्तियाज जलील
इशान किशनची गर्लफ्रेंड आहे मॉडेल, हॉट फोटोंचा सोशल मिडीयावर धुराळा
बापरे! मासे खाताय तर वेळीच व्हा सावध, तुमच्या पोटात जातय प्लास्टिक; वाचा…

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.