बॉलिवूडमधील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिशा पाटनी ३० वर्षांची झाली आहे. तिचा जन्म १३ जून १९९२ रोजी बरेली येथे झाला. दरम्यान, आपल्या सेक्सी लूकने घायाळ करणारी दिशाची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने सांगितले की मुले तिच्यापासून का पळत असत आणि कोणीही तिला कधीही हॉट का म्हणत नसायचे.(Interview with Disha Patni, Bollywood, Baagi 2, Radhe, Bharat, Mangal, Hiropanti 2)
दिशाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले नाही, परंतु तरीही ती इंडस्ट्रीत खूप लोकप्रिय आहे. त्याचबरोबर आगामी काळात तिचे ३-४ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांमध्ये ती बॉलिवूडच्या अनेक सुपरस्टार्ससोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दिशा पटनीच्या वाढदिवसानिमित्त तिचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे.
या मुलाखतीत दिशाने सांगितले होते- माझ्या संपूर्ण आयुष्यात एकही मुलगा माझ्या जवळ आला नाही किंवा मला कोणीही सांगितले नाही की मी हॉट दिसते. इतकंच नाही तर कोणाला माझ्यासोबत फ्लर्टही करायचं नव्हतं. माझ्याशी असे करण्याचा प्रयत्नही कोणी केला नाही.
याचे कारण सांगताना ती म्हणाली होती की- माझ्या वडिलांनी मला मुलासारखे वाढवले. माझे केस लहान असायचे आणि मी ९ व्या वर्गातपर्यंत ते लहान ठेवले. मी शाळेत शांत मुलगी होते आणि नेहमी वर्गात शेवटच्या बाकावर बसायचे. खूप दिवसांनी ग्रूमिंग सुरू केल्याचेही तिने सांगितले.
दिशा पाटनी हिरोईन बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आली होती. मात्र, येथे तिला खूप संघर्ष करावा लागला. तिला तिचा खर्च भागवणे कठीण झाले होते. सुशांत सिंग राजपूतसोबत एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
यानंतर ती बागी २, राधे, भारत, मंगल आणि हिरोपंती २ मध्ये दिसली. तिने काही चित्रपटांमध्ये आयटम डान्सही केले. तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती आगामी काळात योद्धा, एक व्हिलन रिटर्न्स, केटीना आणि प्रोजेक्ट के यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यातील काही चित्रपटांचे शूटिंग अजूनही सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
तुम्ही सिनेमागृहात आलात का? ड्रेसवरून भर कोर्टात न्यायाधीश वरिष्ठ अधिकाऱ्यावर नाराज; व्हिडिओ झाला व्हायरल
IPL मिडिया ऑक्शनमध्ये BCCI मालामाल, एका सामन्याची किंमत गेली तब्बल ‘एवढ्या’ कोटींच्या पुढे
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री सरन्यायाधीश झालेत, ते ठरवतात कुणाचे घर तोडायचे..; औवेसी भडकले