..म्हणूनच कितीही विरोध असला तरी दत्तामामा आमदार होतात मंत्री होतात, कारण ते अचूक वेळ साधतात

पंढरपूर । आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांना विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेचा मान मिळाला आहे. यावेळी राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे देखील उपस्थित होते.

यावेळी शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर भरणे यांनी मंदिरातील पुजाऱ्यांच्या पाया पडून त्यांचाबद्दल आदर व्यक्त केल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी ठाकरे कुटुंबातील सर्वांनी फक्त हात जोडून नमस्कार केला.

भरणे हे राज्यात लोकप्रिय आमदार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मतदार संघात देखील गोरगरिबांच्या सुख दुःखात ते सहभागी होतात. विरोधकांशी देखील ते नम्रपणे बोलत असतात.

जेष्ठ नागरिकांबद्दल ते नेहेमी आदर व्यक्त करतात. त्याची पावती म्हणून राज्यात सर्वांत लक्षवेधी असलेल्या मतदार संघात त्यांनी सलग दोनवेळा हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला.

पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित होते. मात्र दत्ता भरणे यांचा नम्रपणा सर्वांचा चर्चेचा विषय ठरला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.