‘…म्हणून मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला’; संजय राठोड यांचा मोठा खुलासा

सोलापूर। राज्याचे तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर राजीनामा द्यावा लागला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलं होत. संजय राठोड यांच्यावर विरोधक प्रचंड टीका करत होते. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर संजय राठोड यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

त्यानंतर आता संजय राठोड यांनी खुलासा केला आहे. राजीनाम्यासाठी माझ्यावर कोणाचाच दबाव नव्हता, परंतु शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची प्रतीमा मलिन होणार नाही, याची दक्षता घेत मी स्वत:हून राजीनामा दिला, असे स्पष्टीकरण माजी मंत्री राठोड यांनी दिले आहे.

सोलापुरात बंजारा समाजाच्या सहविचार सभे दरम्यान त्यांनी आपली बाजू मांडली आहे. दुसरीकडे विरोधकांनीही अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा दिला होता. घटनेची पारदर्शक चौकशी होऊन सत्य बाहेर यावे म्हणून मी राजीनामा दिल्याचेही ते म्हणाले.

यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली बाजू मांडली आहे. राठोड म्हणाले, राज्यात बंजारा समाजाची लोकसंख्या अंदाजित दीड कोटींपर्यंत आहे. 288 विधानसभा मतदारसंघापैकी 72 मतदारसंघात समाजाची निर्णायक ताकद आहे. समाजाच्या मागण्या पूर्ण होतील, या आशेने आमचा लोकशाही मार्गाने लढा सुरु आहे.

मागील 30 वर्षापासून मी राजकारणात सक्रिय आहे. मात्र अद्याप बंजारा समाजाला न्याय मिळालेला नाही. आमच्या काही मागण्या आहेत. त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितला आहे. लवकर त्यांची भेट घेऊन आमच्या व्यथा मांडू असंही संजय राठोड यांनी म्हटलं आहे.

पुन्हा मंत्रीमंडळात संधी मिळेल की नाही, हे मला माहिती नाही. परंतु, विधानसभेच्या चार निवडणुकांमध्ये माझे मताधिक्‍य वाढत गेले असून 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक फरकाने माझा विजय झाल्याचेही संजय राठोड यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
“रोग, बेरोजगारी, माफिया राज आणि भ्रष्टाचार वगळता, काँग्रेस, सपा आणि बसपा सरकारांनी राज्याला काय दिले? 
गृहीणींंसाठी आनंदाची बातमी! आता खाद्यतेलाच्या किंमती होणार कमी, केंद्राची मोठी घोषणा
मैत्री असावी तर अशी! इवल्याशा कुत्र्याची घोड्यासोबत जमली गट्टी; व्हिडीओ होतोय भन्नाट व्हायरल
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! विराट कोहली कर्णधारपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत..

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.