‘… म्हणून मी शर्टाचे पहिले बटन नेहमी उघडे ठेवायचो’, अशोक सराफांनी स्वतःच केला खुलासा

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी आज वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे. आज त्यांचा ७५ वा वाढदिवस आहे. अभिनेते अशोक सराफ यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यांचे विनोदी चित्रपट पाहून आज देखील प्रेक्षक खळखळून हसतात. अभिनेते अशोक सराफ(Ashok Saraf) यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. (“… so I always kept the first button of my shirt open,” said Ashok Saraf himself)

अभिनेते अशोक सराफ यांचे प्रत्येक चित्रपटामध्ये शर्टाचे पहिले बटन उघडे असायचे. अभिनेते अशोक सराफ यांच्या त्या स्टाइलचे त्या काळी अनेकांनी अनुकरण केले होते. अभिनेते अशोक सराफ शर्टाचे पहिले बटन उघडे का ठेवायचे? हा प्रश्न त्यांच्या सर्व चाहत्यांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर स्वतः अशोक सराफ यांनी दिले आहे.

एका कार्यक्रमात अभिनेते अशोक सराफ यांनी याबाबत खुलासा केला आहे. या कार्यक्रमात शर्टाचे पहिले बटन उघडे ठेवण्याच्या संदर्भात अभिनेते अशोक सराफ यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मजेशीर उत्तर देताना अभिनेते अशोक सराफ म्हणाले की, “शर्टाचे पहिले बटन बंद केले तर सगळा अभिनय माझ्या गळ्याशी यायचा. म्हणून मी शर्टाचे पहिले बटन उघडे ठेवायचो.”

“त्यानंतर काही वर्षे मी स्टाइल म्हणून मी ते ठेवलं होतं. त्यावेळी शर्टाचे पहिले बटन उघडे ठेवण्याची स्टाइल देखील होती”, असे अभिनेते अशोक सराफ यांनी कार्यक्रमात सांगितले. अभिनेता अशोक सराफ यांची ओळख चित्रपटसृष्टीत ‘विनोदाचा सम्राट’ अशी आहे. त्यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘एका पेक्षा एक’, आणि ‘गमंत जंमत’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अभिनेते अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटात देखील महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. ‘करण अर्जुन’, ‘कोयला’, ‘येस बॉस’, ‘सिंघम’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेते अशोक सराफ यांनी महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. गेल्या पन्नास वर्षांपासून अभिनेते अशोक सराफ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

अभिनेते अशोक सराफ यांनी अनेक नाटकांमध्ये देखील काम केले आहे. ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकामध्ये अभिनेते अशोक सराफ यांनी महत्वाची भूमिका केली होती. सध्या अभिनेते अशोक सराफ यांच्या ‘व्हॅक्युम क्लिनर’ या नाटकाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित करत असलेल्या ‘वेड’ या मराठी चित्रपटात अभिनेते अशोक सराफ महत्वाची भूमिका साकारणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
विधान परिषदेसाठी भाजप पाच उमेदवार देणार; दरेकर, मुंडेसह ‘या’ नेत्यांना मिळणार आमदारकी
पृथ्वीराज चौहान यांच्याबद्दल ‘ते’ वक्तव्य करणे अक्षय कुमारला पडले महागात; नेटकऱ्यांनी केले ट्रोल
अर्जुन तेंडुलकरला मुंबईने एकाही सामन्यात का खेळवले नाही? अखेर खरे कारण आले समोर