…त्यामुळे रशियाने जरी कोरोनावर लस तयार केली असली तरी भारताची लागणार मदत

कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी अनेक देश लस बनवण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. पण रशियाने या स्पर्धेत सर्वात आधी बाजी मारुन लस बनवली. मात्र त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर अजून मान्यता मिळालेली नाही. जभरातून या लसीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

भारताने या लसीच्या उत्पादनात स्वारस्य असल्याचं सांगितलं होतं. या संदर्भात भारताकडून रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चाही सुरू होती. भरतासोबत लसीच्या उत्पादनाबाबत करार करत असल्याची माहिती RDIF चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली होती.

पुतीन यांनी अशी घोषणा केली होती की, सगळ्यात आधी रशियाने कोरोनावरील प्रभावी लस बनवली असून ही लस अत्यंत प्रभावी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी आहे असा दावा त्यांनी केला होता.

स्फुटणीक व्ही या लसीचे सुरुवातीचे ट्रायल यशस्वी झाले असून ही लस सुरक्षित असल्याचा दावा रशियाने केला आहे. ४०,००० लोकांना ही लस देण्यात येणार आहे. रॉयटर्सने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

दरम्यान, भारतात तीन लसींवर काम सुरू आहे. यातील दोन लसी भारत बायोटेक आणि झायडस कॅडीला यांनी बनवली आहे. तर एक ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने बनवली आहे ज्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटने भागीदारी केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.