…म्हणून अजित पवारांनी केला छत्रपती संभाजीराजे भोसले यांना फोन

मुंबई । काही दिवसांपासून सारथी संस्था चर्चेत आहे. सारथीवरून विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणात हस्तक्षेप केला आहे.

सारथीवरून सुरू असलेल्या वादासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी सारथीचा प्रश्न सातत्याने मांडत असलेले छत्रपती संभाजीराजे भोसले यांना हजर राहण्याची विनंती अजित पवार यांनी केली आहे.

छत्रपती संभाजीराजे भोसले यांना अजित पवारांनी फोन केला असून या बैठकीला हजर राहण्याची विनंती केली आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मला फोन करून मुंबईला चर्चेसाठी येण्याची विनंती केली. काही महिन्यांपूर्वी समाजाच्या वतीने पुण्यात सारथी कार्यालयाच्या बाहेर लाक्षणिक उपोषण केले होते.

समाजाच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहचवणे हे माझे कर्तव्य समजून पुन्हा चर्चेला जाण्याचा निर्णय घेत आहे. असे संभाजीराजे भोसले यांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.