…म्हणून आदित्य ठाकरेंनी विठ्ठलाची महापूजा अर्धवट सोडली

पंढरपुर । आज पहाटे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक पंढरपुरात पोहोचले. विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी त्यांच्यासह पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मंदिराच्या गाभ्यात महापूजेसाठी बसले होते. अचानक आदित्य हे पूजेतून उठून गेले. त्यामुळे त्यांचे सुरक्षारक्षकदेखील चक्रावले.

नेमके काय झाले ते कुणालाच कळले नाही. थोड्या वेळाने कळले की, त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना पिण्यासाठी पाणी देण्यात आले. त्यानंतर अर्धातास गाडीत बसल्यावर त्यांना थोडे बरे वाटू लागले.

बरे वाटू लागल्यानंतर आदित्य पुन्हा मंदिराच्या गाभाऱ्यात गेले. विठ्ठल-रुक्मिनीचे दर्शन घेऊन मंदिर देवस्थानच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा सत्कार सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचले.

तेथील कार्यक्रमात ते सहभागी झाले. आता त्यांची प्रकृती चांगली ठणठणीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.