सध्या उन्हाळा(Summer) ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत सर्वांनाच जास्त तहान लागते. माणसाला पाणी पिण्यासाठी फार भटकावे लागत नाही. पण मूक पशु, पक्षी आणि प्राण्यांना पाण्याच्या शोधात फिरावे लागते. त्यामुळेच काही लोक उन्हाळ्यात घराबाहेर आणि टेरेसवर प्राणी(Animal) आणि पक्ष्यांसाठी(Birds) घराबाहेर पाणी ठेवतात. तर काही व्यक्ती प्राण्यांना स्वतः पाणी पाजतात.(snake viral video man give water)
पण सापांना पाणी पाजतानाचे कधी पाहायला मिळत नाही. सापांना घाबरणारे लोक जेव्हा समोर साप पाहतात तेव्हा त्यांचा श्वास थांबतो. वास्तविक, जगभरात सापांच्या अनेक विषारी प्रजाती आढळतात. सापाच्या चावण्याने कोणत्याही माणसाचा क्षणार्धात मृत्यू होतो. अशा परिस्थितीत लोकांनी सापांना घाबरणे आवश्यक आहे. पण बरेच लोक बेधडकपणे सापांशी खेळतात.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका सापाचा आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती स्वतःच्या हाताने सापाला पाणी पाजत आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मिडीया युझर्सना मोठा धक्का बसला आहे.
Summer is approaching. Your few drops can save someone’s life. Leave some water in your garden in a container for that can mean a choice between life & death for many animals🙏 pic.twitter.com/ZSIafE4OEr
— Susanta Nanda (@susantananda3) March 9, 2022
हा व्हिडिओ भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले आहे की, “उन्हाळा येत आहे. तुमचे काही थेंब एखाद्याचे प्राण वाचवू शकतात. आपल्या बागेतील कंटेनरमध्ये थोडे पाणी सोडा, ते अनेक प्राण्यांसाठी जीवन आणि मृत्यू यांच्यातील पर्याय असू शकते.”
या व्हिडिओला शेअर केल्यापासून,आतापर्यंत दहा हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ साधारणतः ४९ सेकंदांचा आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले की, “त्या व्यक्तीने चांगले काम केले आहे. पण मी पाणी देण्यासाठी हाताऐवजी कप वापरला असता. त्याचवेळी एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, “तुम्ही खूप छान काम केलं आहे.”
या व्हिडिओला सोशल मीडियावर आतापर्यंत हजारो लोकांनी लाइक केलं आहे. लोक या व्हिडिओला सोशल मीडियावर शेअर करत आहेत. ह्या व्हिडिओमध्ये हिरव्या रंगाचा साप झाडावरून खाली उतरत असताना दिसत आहे. एक व्यक्ती त्या सापाला आपल्या हातात पाणी घेऊन पाजत आहे. या व्यक्तीचे लोक सोशल मीडियावर कौतुक करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
जडेजाला मिळाले त्याच्या ऐतिहासिक कामगिरीचे बक्षिस, होल्डर, अश्विन, शाकिबला मागे टाकत केला ‘हा’ विक्रम
ट्रोलर म्हणाला, ‘दारू पिऊन मालिका लिहीता का?’ ‘आई कुठे काय करते?’ च्या लेखिकेने दिले सडेतोड उत्तर
राजकारणामुळे कुटुंबाने सोडले, कॉमेडियन म्हणून करिअरची सुरूवात, आता होणार पंजाबचे मुख्यमंत्री