जाणून घ्या ‘लाडाची मी लेक गं’ मालिकेतील मम्मी म्हणजेच स्मिता तांबेचा अभिनय क्षेत्रातील प्रवास

सध्या टेलिव्हिजनवर अनेक मालिका खुप प्रसिद्ध आहेत. यातीलच एक मालिका म्हणजे ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेने खुप कमी वेळेत लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

आपण आज या मालिकेत मम्मीची भुमिका निभावणारी अभिनेत्री स्मिता तांबेबद्दल जाणून घेणार आहोत. या मालिकेत स्मिताने अतिशय उत्तम पद्धतीने मम्मीची भुमिका निभावली आहे. प्रेक्षक देखील तिला या भुमिकेत खुप पसंत करत आहेत.

स्मिता तांबेचा जन्म साताऱ्यात झाला होता. पण स्मिताचे वडील पुण्यात कामाला होते. म्हणून त्यांचे पुर्ण कुटुंब पुण्याला स्थायिक झाले. पुण्यातूनच स्मिताने तिचे सगळे शिक्षण पुर्ण केले आहे.

स्मिताला प्राध्यापक व्हायचे होते. म्हणून तिने एम ए एम एलचे शिक्षण पुर्ण करायचा निर्णय घेतला. कॉलेजमध्ये असताना स्मिताचा संबंध अभिनय क्षेत्राशी आला. त्यामुळे तिने शिक्षण पुर्ण होइपर्यंत अभिनय करण्याचा निर्णय घेतला.

तिने अनेक नाटकांमध्ये काम केले. नाटकाच्या सरावासाठी स्मिता पुण्यातून मुंबईला जायची आणि सराव झाल्यानंतर रात्री परत पुण्याला यायची. हे सगळे करत असताना स्मिताला अभिनयात रुची निर्माण झाली. त्यामुळे तिने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे स्मिताने काही दिवसांनी दिवस अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला. पण याच कालावधीमध्ये स्मिताचे ‘हर हायनस अनिता’ हे नाटक आले. या नाटकाने स्मिताचे आयुष्य बदलून टाकले.

या नाटकानंतर तिला अनेक नाटके आणि मालिकांच्या ऑफर येऊ लागल्या. स्मिताने बापाचा बाप, श्रीमान योगी, हामिदाबाई कोठी यांसारखे अनेक अनेक नाटके केली. ही सर्व नाटकं खुप प्रसिद्ध झाली. त्यामुळे स्मिताला चित्रपट आणि मालिकांच्या ऑफर येऊ लागल्या.

‘जोगवा’ हा स्मिताचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटामध्ये तिने अतिशय उत्तम अभिनय केला आहे.
त्यानंतर तिने ७२ मेल, कँडल मार्च हे चित्रपट केले. हे चित्रपट देखील खुप यशस्वी ठरले. तिचे अभिनेत्री म्हणून सगळीकडे कौतुक होत होते.

मराठीसोबतच स्मिता तांबेने हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिची भेट धिरेंद्र द्विवेदीसोबत झाली. या दोघांमध्ये खुप चांगली मैत्री झाली आणि कालांतराने या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

स्मिता आणि धिरेंद्रने लग्न केले आहे. अभिनयासोबतच स्मिताला खाण्याची आणि फिरण्याची खुप जास्त आवड आहे. सध्या स्मिता मराठी टेलिव्हिजनवर मम्मी म्हणून खुप प्रसिद्ध आहे. स्मिताच्या नव्या मालिकेने तिला अजून जास्त प्रसिद्धी मिळवून दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘राज’ चित्रपटातील ‘ही’ अभिनेत्री आठवली का? जाणून घ्या आज काय करते

सोशल मिडियावर शिल्पा शेट्टीने पहिल्यांदाच शेअर केला मुलीचा व्हिडिओ; पाहा व्हिडिओ

मेकअप न करता ‘अशा’ दिसतात बॉलीवूडच्या अभिनेत्री; फोटो बघून शॉक व्हाल

लग्नासाठी विवेक ऑबेरॉयने त्याच्या पत्नीसमोर ठेवली होती ‘ही’ अट; अट ऐकूण बायको झाली आश्चर्यचकीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.