अमिताभ बच्चन यांच्यासोबत बोल्ड सीन दिल्यानंतर रात्रभर रडत होती स्मिता पाटील, शेवटी..

हिंदी चित्रपटसृष्टीतीने आपल्याला प्रत्येक एका मुडसाठी एक वेगळे गाणे दिले आहे. त्यामूळे प्रत्येक एक परिस्थितीसाठी आपल्याला अनेक गाणी आठवतात.

पावसासाठी देखील आपल्याकडे अनेक गाणी आहेत. पण काही ठराविक गाणी ही सर्वात हिट आहेत. नमक हलाल चित्रपटातील ‘आज रपट जाऍ तो’ हे गाणे देखील याच यादीत येते.

या गाण्यात स्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन यांनी केमिस्ट्री पहायला मिळाली होती. पण या गाण्याचे चित्रीकरण सुरू होते. तेव्हा स्मिता पाटील खुप रडल्या होत्या. त्याला कारणही तसेच होते. चला तर मग जाणून घेऊया काय होते ते कारण

स्मिता पाटील हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

१७ ऑक्टोबर १९५५ साली पुण्यामध्ये स्मिता पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण शिक्षण महाराष्ट्रात झाले. त्यांचे वडील शिवाजी पाटील महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होते आणि आई सामाजिक कार्यकर्त्या होत्या.

स्मिता पाटील यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर न्यूज अँकर म्हणून मराठी टेलिव्हिजनमध्ये काम करण्यास सुरवात केली. या कालावधीमध्ये त्यांनी सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक श्याम बेनेगल यांची भेट घेतली.

बेनेगल यांनी त्यांच्या ‘चरणदास चोर’ या चित्रपटात त्यांना एका छोट्या भुमिकेची ऑफर दिली. भारतीय चित्रपटसृष्टीत हा चित्रपट ऐतिहासिक चित्रपटाच्या रूपात आठवला जातो.

त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भुमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयाने त्यांना खुप कमी वेळात चित्रपटसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण करून दिले.

स्मिता पाटील यांनी मंथन, भुमिका, आक्रोश, मंडी, बाजार, अर्थ अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार भुमिका निभावल्या आहेत. त्यामूळे स्मिता पाटील एक प्रसिद्ध अभिनेत्री झाल्या होत्या.

स्मिता पाटील यांनी १९८२ मध्ये अमिताभ बच्चनसोबत ‘नमक हलाल’ चित्रपटामध्ये काम केले होते. पण या चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंग केल्यानंतर पुढील शूटिंग करण्यास नकार दिला.

या चित्रपटातील सर्व गाणी सुपरहिट झाली होती. पण खास करून ‘आज रपट जाऍ तो’ हे गाणे खुप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले होते. याच गाण्याच्या शुटिंगला स्मिता पाटील यांनी नकार दिला होता.

कारण, या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी त्यांना पावसात शूट करावे लागले. पहिल्या दिवसाच्या चित्रीकरणावेळी त्या पूर्णपणे भिजल्या होत्या. त्यांना वाटत होते की, हे आपल्या चाहत्यांना हे आवडणार नाही.

या गाण्याच्या शुटिंगनंतर स्मिता खूप रडल्या आणि पुढे काम करण्यास नकार दिला. दुसर्‍याच दिवशी, अमिताभ बच्चन यांना समजले की त्या सीनमुळे स्मिता पाटील खूप दुःखी आहेत.

त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी स्मिता पाटील यांना समजावून सांगितले की चित्रपटाच्या पटकथेची मागणी होती. त्यामुळे त्यांना असा सीन करावा लागला. अमिताभ यांनी बर्‍यापैकी मन वळवल्यानंतर त्यांनी चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले.

चित्रपट रिलीज झाल्यानंतर हेच गाणे सर्वात हिट झाले होते. त्यामूळे स्मिता पाटील खुश झाल्या आणि त्यांना आपण जे केले योग्य केले. असे वाटले. आजही हे गाणे सर्वात मोठे हिट आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.