Crime Diary : बिहारमधील समस्तीपूर (Samastipur) या जिल्ह्यातील एक अमानुष आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. स्मिता झा (Smita Jha) या महिलेने आपल्या पतीचा खून केल्यानंतर जे काही केलं, त्याने पोलीस खात्यासह सर्व समाजाला हादरवून टाकलं आहे. तिच्यावर आरोप आहे की, तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने सोनू झा (Sonu Jha) याचा निर्घृण खून केला आणि मृतदेहाजवळच आपल्या प्रियकर हरिओम (Hariom) सोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले.
६ वर्षांचा मानसिक व शारीरिक छळ
पोलिसांच्या माहितीनुसार, स्मिता आणि सोनू यांचं लग्न झाल्याला सहा वर्षं झाली होती. सुरुवातीपासूनच त्यांच्यात तणावाचं वातावरण होतं. सोनू सतत तिला मारहाण करायचा, शिवीगाळ करायचा आणि दारूच्या नशेत वाईट वागणूक द्यायचा. स्मिताचा दावा आहे की, पती तिला इतर पुरुषांसोबत संबंध ठेवण्यासाठी भाग पाडत होता.
या सर्व त्रासाच्या काळात, स्मिताच्या मुलांना शिकवायला येणारा ट्युशन शिक्षक हरिओम हळूहळू तिच्या जवळचा झाला. त्याने स्मिताच्या दु:खाकडे सहानुभूतीने पाहिलं आणि त्यांचं नातं काही काळातच प्रेमात बदललं.
२५ जुलैच्या रात्री, सोनू दारू पिऊन घरी आला आणि स्मितावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. नकार दिल्यावर त्याने पुन्हा तिला मारहाण केली. अखेर, संयम सुटलेल्या स्मिताने चहाच्या केटलने त्याच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. त्यानंतर तिने हरिओमला बोलावलं आणि दोघांनी मिळून सोनूवर हल्ला केला. तरीही त्याचा जीव गेला नाही म्हणून त्याच्या गळ्यात वीजेची वायर गुंडाळून त्याला करंट दिला आणि ठार केलं.
मृतदेहासमोर प्रेमा-पश्चात्तापाचा अभाव
या धक्कादायक हत्येनंतरही स्मिता शांत होती. पोलिसांना सांगितलं गेलं की, सोनूचा मृतदेह घरात असतानाच स्मिता आणि हरिओमने एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवले. या घटनेने हत्येच्या विकृत घटनांमध्ये एक नवा थरारक अध्याय जोडला गेला.
पोलिसांकडून दोघांनाही अटक
स्थानिक पोलिसांनी स्मिता झा आणि हरिओम या दोघांनाही अटक केली असून, त्यांनी चौकशीत आपला गुन्हा मान्य केल्याची माहिती मिळते. तपास अधिक खोलवर सुरू असून, दोघांचाही कबुलीजबाब सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.