Homeइतरदगड, विटांचा वापर न करता कमी वेळेत, कमी खर्चात स्मार्ट घर; टेक्नीक...

दगड, विटांचा वापर न करता कमी वेळेत, कमी खर्चात स्मार्ट घर; टेक्नीक वाचल्यावर तुम्हीही थक्क व्हाल

आपल्या डोक्यावर चांगले छत असण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. चार भिंती असल्या तरी एकदम टकाटक असावे अशी इच्छा असते. घर एकदाच होते, त्यामुळे पैशांसाठी घर बांधण्यास वेळ लागला तरी लोक थांबत थांबत पैसे येईल तसे घराचे काम करतात. मात्र आता सांगलीमधील इंजिनिअर महेशकुमार पाटील यांनी घर बांधणीचा अजब प्रयोग केला आहे. ज्यामुळे अगदी कमी किमतीत स्मार्ट घर बांधले गेले आहे. या त्यांच्या प्रोयोगाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

जागेच्या अभावी, तसेच बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमतींमुळे घर बांधणे सवर्सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे जाते. त्यामुळे कित्येकांची घर बांधण्याची इच्छा अपूर्ण राहते. अशातच सांगलीतील इंजिनिअर महेशकुमार आणि त्यांच्या टीमने कमी वेळेत आणि कमीखर्चात अगदी तीन महिन्यातच स्मार्ट घर बांधले आहे. मोनोलिथिक इंटेलिजन्स म्हणजे एकसंध बांधकाम, सुरक्षितता आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असणाऱ्या या घराची चर्चा सर्वत्र होत आहे.

इंजिनिअर महेशकुमार पाटील आणि त्यांचे टीम सदस्य भूषण गोडसे आणि विशाल ननावरे यांनी ग्रामीण भागातील लोकांसाठी कमी खर्चात आणि कमी वेळेत घर बांधले आहे. या घराचा प्रोटोटाईप प्रोजेक्ट त्यांनी आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर गावात नुकताच पूर्ण देखील केला आहे. येथील कांतीलाल बाड यांच्यासाठी ५५० चौरस फुटांचे काँक्रीटचे मोनोलेथिक इंटेलिजन्स संकल्पनेवर आधारित घर बांधले आहे.

या घराचे वैशिष्टय म्हणजे, या घराचे बांधकाम एकसंध आहे. या बांधकामात विटांचा वापर नाही. एकाच वेळी दरवाजे, पोटमाळे, खिडक्या, बाल्कनीचे डिझाईन केलेले आहे. तसेच,घरात सोलर विजेवर पंखे आणि लाईट्स चालतात. यासाठी लाईट्स आणि पंख्यांना ऍलेक्साची व्हाईस कंट्रोल व्यवस्था देखील आहे. या घरांच्या मुख्य दरवाजांना डिजिटल लॉक सुविधा देण्यात आली आहे.

एवढ्या साऱ्या आधुनिक सुविधांचा वापर करून हे घर सुशोभित करण्यात आले आहे, तेही अगदी तीन महिन्यांच्या कालावधीतच हे घर पूर्ण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एखाद्या आरसीसी फ्रेम रचनेच्या वस्तूची जेवढी मजबुती असेल तेवढेच हे घर मजबूत असल्याचे बोलले जात आहे. मोनोलेथिक इंटेलिजन्स ही संकल्पना जुनी आहे, मात्र ग्रामीण लोकांना परवडणारी आणि आधुनिक सुविधांयुक्त आहे.

हे घर बांधणाऱ्या महेशकुमार पाटील यांनी यासाठी स्ट्रक्चलर अभ्यास केला आहे. घर बांधत असताना भार आणि क्रॅक कसे कमी करता येईल यादृष्टीने दरवाजे, खिडक्या यांचे डिझाईन केले आहे. अशा प्रकारच्या घराची डिझाईन पाहून आणि त्यातील आधुनिक सुविधा पाहिल्या तर खर्च अधिक असेल वाटते मात्र केवळ सहा लाखांमध्ये असे प्रशस्त घर बांधण्याचा प्रयोग महेशकुमार पाटील यांनी केला आहे. त्यामुळे हे घर अधिकच चर्चेत आले आहे.

महत्वाच्या बातम्या
मुस्लिम महिलांची बोली लावणाऱ्या ॲपची मास्टरमाईंड श्वेताच्या मनात मुस्लिमांविषयी एवढा द्वेष का?
रश्मी देसाईने नंदिश संधूसोबतच्या घटस्फोटाबद्दल ढसाढसा रडत केला धक्क्कादायक खुलासा; म्हणाली, ‘आजही वेदना होतात’
..तर लाॅकडाऊन लावण्याचा विचार करणार; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले लाॅकडाऊनचे संकेत