नवी दिल्ली | २० महिन्याच्या मुलीच्या मृत्युनंतर तिच्या आईवडिलांनी लेकीच्या मृत्युचे दु:ख बाजुला ठेवत समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. आपल्या मुलीचे लिवर, किडन्या, हृदय, दोन्ही डोळ्यांचे पडदे त्यांनी रूग्णांना दान केले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे कौतूक करण्यात येत आहे. तसेच अवयवदानाचा हा निर्णय प्रेरणादायी ठरत आहे.
८ जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास धनिष्ठा नावाची मुलगी घराच्या पहिल्या मजल्यावर खेळत होती. खेळताना तीचा तोल जाऊन ती जमिनीवर आदळली होती. त्यात तिच्या डोक्याला मार लागला होता. बेशुध्द अवस्थेत तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी प्रयत्न करूणही धनिष्ठाला वाचवता आलं नाही. डॉक्टरांनी तिला ब्रेनडेड घोषित केले.
आपल्या लेकीचं निधन झाल्याचं समजल्यावर त्यांना धक्क बसला. पण तरीही त्यातुन सावरत धनिष्ठाचे आईवडिल आशिष आणि बबीता यांनी आपल्या मुलीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी तातडीने धनिष्ठाचे अवयव काढून त्याचे ५ रूग्णांना प्रत्यारोपन केले आहेत.
याबाबत धनिष्ठाचे वडिल आशिष यांनी सांगितले की, ‘’आम्ही आमच्या मुलीला गमावले असले तरी तिचे अवयव दान करुन रूग्णांना जीवनदान दिले आहे’’.
दरम्यान भारतात ०.२६ प्रति मिलियन इतका कमी अवयवदानाचा दर आहे. अवयव निकामी झाल्यामुळे दरवर्षी भारतात ५ लाख लोकांचा मृत्यु होतो अशी माहिती रूग्णालयाने दिली आहे.
महत्तवाच्या बातम्या-
घटस्फोट झाला नाही तरीही त्यांच्या पत्नीपासून वेगळे राहतात नाना पाटेकर; जाणून घ्या कारण
पोलीस, सुरक्षारक्षकांशिवाय भल्या पहाटे धनंजय मुंडे एकटेच चित्रकूट बंगल्यावर; माध्यमांना दिला चकवा
कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडेंना नवीन पदभार, नऊ महिन्यानंतर अखेर ‘या’ ठिकाणी नियुक्ती
आत्म.हत्येची चिठ्ठी लिहून गायब झालेला शेतकरी सापडला; बच्चू कडूंविरुद्ध पत्नीने केली होती तक्रार