मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काम करण्याच्या पद्धतीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यादरम्यान एका चिमुकलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संवाद साधला आहे. मलाही गुवाहाटीला न्या, असा हट्ट चिमुकलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्याकडे धरला. यावर मुख्यमंत्र्यांनी देखील मुलीचा हट्ट मान्य केला.(small girl insistence CM Eknath Shinde)
अन्नदा नावाच्या एका लहान मुलीने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी अन्नदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हणाली की, “माझ्या मोठ्या बाबांनी मला टीव्हीवर दाखवलं होतं की तुम्ही कोरोनामध्ये लोकांची खूप मदत केली. पूर आला होता तेव्हा पाण्यात जाऊन तुम्ही मदत केली”, असे अन्नदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले.
“मी पण जर अशी मदत केली, तर मलाही मोठं झाल्यावर मुख्यमंत्री होता येईल का?”, असा प्रश्न अन्नदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हसले आणि म्हणाले की, “नक्की होता येईल. आपण त्यासाठी खास रिझर्वेशन करू.” भेटीदरम्यान अन्नदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेक प्रश्न विचारले.
आता तुम्ही रुद्रांशला वेळ कसा द्याल? असा प्रश्न देखील अन्नदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला. अन्नदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढे म्हणाली की, “पूर्वी मला फक्त मोदी आवडायचे, पण धर्मवीर चित्रपट पहिल्यापासून तुम्हीही आवडू लागले आहात”. यावेळी अन्नदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक हट्ट धरला.
दिवाळीच्या सुट्टीत मलाही गुवाहाटीला घेऊन जा, असा हट्ट अन्नदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरवातीला काहीच उत्तर दिले नाही. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्नदाचा हट्ट मान्य केला. “कामाख्या देवीच्या दर्शनाला जायचंय ना, जाऊया”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद नामांतराचा ठाकरे सरकाराच्या काळातील निर्णय रद्द केला होता. ठाकरे सरकार अल्पमतात असताना हा निर्णय घेण्यात आला होता, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. शुक्रवारी पुन्हा एकदा नवीन सरकारने औरंगाबाद नामांतराचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
महाराष्ट्रातील एसटी बसला मध्य प्रदेशात भीषण अपघात; अपघाताचा थरार वाचून उभा राहील अंगावर काटा
‘अरे मंत्रिपद काय घ्यायचं, मी स्वतःला मुख्यमंत्री समजतो,’ मुख्यमंत्री शिंदेंसमोरच बंडखोर आमदाराने थोपटले दंड
उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ जानकरांनांही जबर धक्का! पदाधिकाऱ्यांनी सांगितला पक्षावरच हक्क