असे म्हणतात की मुलं ही देवाघरची फूलं असतात. त्यांचे वागणे, हसणे, बोलणे, दंगा घालणे हे काही जणांना आवडते तर काहींना त्याचा खुप त्रास होतो. पण लहान मुलांमुळे घर भरल्यासारखे वाटते. काही वेळा लहान मुलांचे प्रश्न असे असतात की आपल्यालाच विचार करायला भाग पाडतात.
बऱ्याच वेळा लहान मुलांचे काही भन्नाट व्हिडीओज सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. अशीच एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाली आहे जी पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरूण हसाल. हा व्हिडिओ एका मुलाचा आहे. ज्यामध्ये त्याचे मामा आणि त्याचे अन्य घरचे त्याला तलावावर पोहायला शिकवण्यासाठी आले आहेत.
त्या मुलाचे मामा पाण्यात उभे राहूण आपल्या भाच्याला पोहायला शिकवायला तयार आहेत. पण भाचा मात्र पाण्यात घाबरत घाबरत उतरत आहे. आता तो पहिल्यांदाच पोहायला शिकत आहे त्यामुळे भीती वाटणे साहजीकच आहे. त्यात काही नवीन नाही.
पण पाण्यात उतरताना त्याने काही शाब्दिक फटकेबाजी केली आहे ती पाहण्यासारखी आहे. त्याचे बोलणे ऐकूण त्याच्या घरचेही हसायला लागतात. तो कारणे देतो की, अजून मोठा झालेलो नाही, मोबाईल नाही, हातात काम नाही, वडिलांसारखी मोठी गाडी नाही.
तो अनेक कारणे देतो पण त्याचे मामा त्याला पाण्यात घेऊन जातात. तो बुडू नये म्हणून त्याच्या पाठीला एक प्लास्टीकचा कॅन कायम बांधलेला आहे. त्याला पोहताना बघण्यासाठी सगळे लोक तेथेच थांबलेले आहेत आणि तो जे बोलतोय ते ऐकत आहेत आणि त्याची मजा घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
बर्थडे स्पेशल: ‘रामायण’ मालिकेनंतर अरुण गोविल यांचे करिअर झाले होते खराब; जाणून घ्या कारण
मुख्यमंत्री साहेब, माझं लग्न करुन द्या; युवकाचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
शाब्बास! नोकरी सोडुन तरूणांनी सुरू केली बँक; गावातील तरूणांनाही दिला रोजगार
भगवान रामाची भुमिका साकारण्यासाठी अरूण गोविल यांनी केले होते ‘हे’ काम, वाचून आश्चर्य वाटेल