अनैतिक संबंधामुळे घराची बदनामी झाल्याने, छोट्या भावाने मोठ्या भावावर केला कुदळीने वार

झारखंडमधील सिमदेगा जिल्ह्यातील कोलेबिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरसलोयामध्ये छोट्या भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यातील कोलेबिरा पोलीस-ठाण्याच्या हद्दीतील बरसलोयामध्ये छोट्या भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना समोर आले आहे. मोठ्या भावाचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे कुटुंबाला मोठ्या प्रमाणात बदनामीला सामोरे जावे लागत होते. त्याचबरोबर घरात वारंवार वादविवाद होत होते.

समजूत काढल्यानंतर ही मोठा भाऊ सदर महिले पासून दूर जायला तयार नव्हता, त्यामुळे वैतागून अखेर लहान भावांने मोठ्या भावाचा कुदळीने वार करून खून केला आहे. पोलिसांनी आरोपी छोट्या भावाला अटक केली आहे.

एसपी. डॉ. तब्रेज यांनी असे सांगितले आहे की, हत्येचा तपास करताना संशयाची सुई मृताचा सख्या भाऊ असीम टोपनो त्याच्याकडे वळली आहेत. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडून गुन्हा कबूल करून घेतला आहे.

असिमचा मोठा भाऊ बरसलोया कुबीरोलीमध्ये राहणारया महिलेच्या प्रेमात पडला होता. या महिलेसोबत त्याचे तीन ते चार वर्षापासून अनैतिक संबंध होते, याप्रकरणी गावांमध्ये पंचायतही बसवण्यात आली होती.

त्याचबरोबर मृताला बरसलोया कुबरोली येथे जाण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र तरीही तो त्या ठिकाणी जात असल्याने कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत होते.

आठवड्यापूर्वी मृताचे त्याच्या पत्नीसोबत भांडण देखील झाले होते. त्यानंतर ती मुलांना सोडून देखील निघून गेली होती. तेव्हापासून आरोपीच मृताच्या मुलांचा सांभाळ करत होता. मोठ्या भावाच्या अशा गैरवर्तनामुळे वैतागून अखेर त्यांने बरसलोया कुबोरोली येथे महिलेच्या घरी झोपलेल्या भावाची कुदळीने वार करून हत्या केली आहे.

यादरम्यान आरोपीने दाखवल्याप्रमाणे पोलिसांनी त्यासाठी वापरलेली कुदळ जप्त केले आहे. तसेच आरोपीची तुरुंगात रवानगी देखील करण्यात आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.