लोकलमध्ये डोळ्यावर मास्क लावून झोपला; मंत्री म्हणाले, ‘काय चूक आहे त्या कोरोनाची’?

मुंबई| राज्यात वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. काही दिवसांपासून कोरोना कमी होताना दिसून येत असल्याने देशातील परिस्थितीत सूधारणा होत होती. अशातच वाढत्या गर्दीमुळे कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कडक निर्बंध लावले आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे यांसारख्या गोष्टी पाळण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

सोशल मिडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये मुंबईच्या लोकलमध्ये एक तरूण डोळ्यावर मास्क लावून झोपला आहे. हा फोटो कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. सध्या या फोटोने सोशल मिडियावर धूमाकूळ घातला आहे.

युवक कॉंग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी हा फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करत ‘काय चूक आहे त्या कोरोना व्हायरसची’? असं कॅप्शन दिलं आहे.

 

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सत्यजीत तांबे यांच्या ट्विटला रिट्विट करत मित्रांनो असं बेजाबदार वागू नका! मास्कचा योग्य वापर करा, कमीत कमी स्वत:च्या आणि कुटूंबाच्या आरोग्याकरिता. असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान मुंबईत कोरोनाची संख्या वाढत चालली आहे. लोकल ट्रेनमध्ये गर्दी कशी कमी करता येईल याबाबत विचार सूरू आहे. लोकलच्या फेऱ्याही कमी करण्याचा विचार केला जात असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
राणादाने सुरू केला हा भन्नाट बिझनेस, व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांना दिले आमंत्रण
मुंबई पोलीसांपाठोपाठ भाजप नेत्यांचा पुणे पोलीसांवरही अविश्वास? तपास काढून घेण्याची मागणी
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनानं थैमान! लहान मुलांमध्ये वाढतंय कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण
हे’ आमिश दाखवत डिलेव्हरी बॉयने ६६ महिलांना जाळ्यात अडकवून केला बलात्कार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.