पालथे झोपणे ठरू शकते धोक्याचे! जाणून घ्या तज्ञांचा सल्ला..

आपल्या शरीराची काळजी आपण घेतली नाही तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच आपण चुकीच्या पद्धतीने झोपलो तरी देखील आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आपण कामावरून थकून आले की लगेच अंग टाकून देतो. शरीराला आराम गरजेचा असतो.

अनेकांना पोटावर किंवा पालथे झोपायची सवय लागलेली असते. खरे तर आपल्या दृष्टीने ती अत्यंत आरामदायी झोपण्याची क्रिया असली तरी प्रत्यक्षात मात्र ते आपल्या शरीरासाठी त्रासदायक ठरणारी असते.

अशा प्रकारे आपण झोपलो तर ते मानसिकरीत्याही घातक ठरू शकते. आपण बघत असतो अशा रात्रीचेही अनेक जन पोटावर झोपत असतात. पुढे मात्र यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे मणक्याला त्रास होऊ शकतो. सोबतच छातीवरही ताण येतो. यामुळे मणक्याचे आजार देखील वाढतात.

असे झोपले तर मान एका बाजूला वळवली जाते यामुळे मानेचे दुखणे, आखडणे असा त्रास होऊ शकतो. आणि ते आपल्यासाठी धोक्याचे ठरू शकते. यामुळे झोपताना काळजी घेणे गरजेचे आहे.

आपल्याला 8 तासाची झोप आवश्यक आहे. झोपताना थेट पोटावर झोपण्याऐवजी एका कुशीवर झोपावे. डाव्या कुशीवर झोपले तरी काही अडचण येत नाही. पोटावर झोपल्याने होणारा त्रास टाळण्यासाठी पाठीवर किंवा कुशीवर झोपण्याची सवय लावा. अनेकांना यामुळे मणक्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.