तुम्ही रात्री झोपताना उशाखाली मोबाईल ठेवत असाल तर हे नक्की वाचा, होऊ शकतात गंभीर परिणाम

मुंबई । आजच्या जगात अगदी लहान मुलांकडे देखील आपल्याला सहज मोबाईल दिसतो. त्याची गरज देखील आहे. मात्र तो सतत जवळ ठेवल्यामुळे आपल्याला त्रास देखील होऊ शकतो. स्मार्टफोनचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. याचे फायदे तोटे समजून घेणे गरजेचे आहे.

रात्री झोपताना देखील आपला फोन जवळ ठेवण्याची सवय अनेकांना असते. मात्र यावेळी फोनमधून निघणारे रेडिएशन लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतो. रेडिएशनचा परिणाम सर्वात आधी डोळ्यांची जळजळ आणि झोप न येण्याची समस्यांपासून सुरु होतो. हा त्रास वाढत जाण्याची देखील शक्यता असते.

तज्ज्ञांनी सांगितले की, फोन चुकीच्या ठिकाणी ठेवल्यानेही आपण अनेक रोगांना बळी पडू शकतो. तसेच मागच्या खिशात मोबाइल कधीही ठेवू नये. यामुळे पायाच्या नसावर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे तुमचे पाय दुखू शकतात. तसेच फोनला मागील खिशात ठेवल्यास पाठदुखीचा त्रास देखील होतो.

तसेच झोपताना उशाखाली मोबाईल ठेवल्याने देखील त्रास होतो. यामुळे फोनमधून उत्सर्जित होणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते. सोबत चक्कर येण्यासारखी समस्या देखील होऊ शकते. फोनमधून निघणारे रेडिएशन अत्यंत हानिकारक आहे. अभ्यासात ते समोर आले आहे.

तसेच फोनवर बोलत असताना, मोबाईल डिव्हाइस कानाशी जास्त चिटकून बोलू नका. मोबाईल कानापासून किमान 0.5 ते 1.5 सेंटीमीटर लांब असावा. असे केल्याने फोनच्या स्क्रीनवर उपस्थित बॅक्टेरिया त्वचेच्या संपर्कात येत नाहीत. तसेच कॉलिंग दरम्यान मोबाईलचे रेडिएशन अधिक वाढलेले असते, जे आपल्यासाठी हानिकारक आहे.

मोबाईल ही आजच्या जगात एक गरजेची वस्तू बनली आहे. आज मोबाईलची गरज आणि फायदा देखील मोठा आहे. मात्र त्याची योग्य माहिती नसल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

महत्वाच्या बातम्या
आपले आयुष्य उध्वस्त केले रिया तुरुंगातून घरी येताच रियाच्या आईने दिली पहिली प्रतिक्रिया
शेतकऱ्यांना नडणाऱ्या कंगनाला भिडला शेतकरी; चांगलाच उतरवला माज
काजूपेक्षाही उपयुक्त चीलगोजा ड्रायफ्रूट; वजन कमी करायला व प्रतिकारशक्ती वाढीला रामबाण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.