हाताने चाचपणे, चाळे करणे लैंगिक अत्याचारात मोडत नाही; हायकोर्टाचा वादग्रस्त निर्णय

मुंबई | ‘शरीराला हाताने चाचपडणे, चाळे करणे किंवा बाहेरून केला गेलेला स्पर्श लैंगिक अत्याचारात मोडता येणार नाही,’ असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. तसेच लहान मुलांच्या छातीला बाहेरुन हात लावणे हा लैंगिक अत्याचार होऊ शकत नाही.

एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपीने त्याच्या शिक्षेला आव्हान दिले होते. त्या खटल्याची सुनावणी करताना नागपूर खंडपीठाने हा निकाल दिला. न्या. पुष्पा गणेडीवाला यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने दिलेल्या निर्णयाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

तसेच लैंगिक अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी असलेल्या POCSO कायद्यामधील तरतुदींकडे या सुनावणीच्या दरम्यान न्या.गणेडीवाला यांनी लक्ष वेधले. त्यांनी म्हंटले की या कायद्याच्या अंतर्गत करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या व्याख्येनुसार, ‘आरोपीनं लैंगिक अत्याचाराच्या हेतूनं मुलांच्या नाजूक अवयवांना स्पर्श करणे आवश्यक आहे.’

मात्र या प्रकरणात आरोपीने पीडित मुलीचा टॉप काढला किंवा तिची छाती दाबलेली नाही. त्यांच्यामध्ये कोणताही प्रत्यक्ष संपर्क झालेला नाही. नेमक्या माहितीशिवाय या प्रकरणातील गुन्ह्यांना लैंगिक म्हणता येणार नाही. हे गुन्हे लैंगिक अत्याचाराता मोडत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अल्पवयीन मुलीची छाती दाबणे आणि तिला अर्धनग्न करण्याच्या गुन्ह्याखाली शिक्षा देण्यात आलेल्या आरोपीने दाखल केलेल्या याचिकेवर नागपूर खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सध्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा होतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
बातमी कामाची! राज्यात नोकरभरतीला सुरुवात; पाहा कोणत्या विभागात किती पदांसाठी भरती
लस घेण्यासाठी मोबाईल नंबर आधार कार्डशी करावे लागणार लिंक; वाचा सरकारचे आदेश
‘नोटेवरील गांधींचा फोटो बदलून शिवाजी महाराजांचा लावावा’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.