गेल्या सहा वर्षांपासून घराबाहेर नाही पडली ही महीला; कारण ऐकून धक्का बसेल

सध्या देशात कोरोना महामारीने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. अश्यातच ऑक्सिजनचा साठा, रेमेडीसीवर इंजेकशन्सचा तुटवडा आणि अपुऱ्या आरोग्य सुविधा यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

आपण सध्या कोरोनाने हैराण झाले असताना जगात अशी एक स्त्री आहे जीने आपल्या घराबाहेर पाऊल ठेवलेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून स्त्री घरातच आहे, कदाचित हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल मात्र हेच सत्य आहे. ३५ वर्षीय एम्मा डेव्हिस एमेटोफोबियाने ग्रस्त आहे.

एमेटोफोबिया हा एक प्रकारचा भीतीदायक रोग आहे, ज्यात रुग्णाला भीती वाटते आणि तो सारखा उलट्या करत राहतो. उलट्या पाहिल्यानंतर किंवा इतरांना उलट्या झाल्यावर या रुग्णांना उलट्या होण्याची भीती असते. हा फोबिया काही लोकांसाठी इतका तीव्र असू शकतो की, तो एखाद्या व्यक्तीची जीवनशैली पूर्णपणे बदलू शकतो.

या रोगाच्या भीतीमुळे एम्माने गेली ६ वर्षे घर सोडलेले नाही. ती बाहेर गेल्यास तिला उलट्या होऊ शकतात ही भीती तिच्या घरच्यांना नेहमीच असते. एम्माचा हा फोबिया १२ वर्षांपूर्वी शिगेला पोहोचला होता.

एम्मा म्हणते की जेव्हा ती २३ वर्षांची होती तेव्हा तिला समजले की, ती अशा आजाराने ग्रासले आहे. एम्माने सांगितले की गेल्या काही वर्षांत तिची प्रकृती अधिकच खराब झालेली आहे.

या रोगात कधी-कधी घरीच आराम करत असताना देखील तिला एमेटोफोबियाचा झटका येत असतो. अनेक लोकांनी एम्माचा हा आजार पाहून चिंता आणि भीतीदेखील व्यक्त केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.