खतरनाक! बाईकवर बसून तरूण करत होता स्टंट, अन् त्यानंतर जे घडलं….

मुंबई | आजकाल सोशल मिडिया हे दैनंदिन जीवनाचा घटक बनलेला आहे. सोशल मिडिया मनोरंजनाचं साधन आहे. यावर अनेक फोटो, व्हिडियो व्हायरल होत असतात. त्याचा आपन पुरेपुर आनंद घेत असतो.

सोशल मिडियावरील काही व्हिडियो, फोटो आपल्याला आवडतात. काही व्हिडियो विनोदी असतात तर काही व्हिडिओ मनाला चटका लावणारे असतात. असाच एक मोटरसायकलवर स्टंट करणाऱ्या तरूणाचा व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल झालेला आहे.

आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून स्टंटचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता, एक युवक रस्त्यावर त्याच्या मोटरसायकलवर उभा राहून स्टंट करत असतो. अचानक तरूणाचं मोटरसायकलवरील नियंत्रण बिघडतं. त्याला मोटरसायकल कंट्रोल करता येत नाही आणि तोल जाऊन तो डांबरी रस्त्यावर चक्क डोक्यावर आपटतो.

स्टंट करताना तरूणाच्या मोटरसायकलचा वेग अधिक असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. त्यामूळे स्टंट करायच्या नादात तो जोरात आपटला आहे. त्याच्या डोक्याला मार लागला असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे. तुम्ही तुमच्या मित्रासोबत, मुलासोबत अशी घटना घडताना पाहू शकता का? नसेल पाहिला तर त्यांना असा मुर्खपणा करण्यापासून थांबवा. सुरक्षेला प्राथमिकता द्यायला हवी. नियमांचे पालन करायला शिकवायला हवे.

दरम्यान स्टंट करणे हे काय नवीन नाही. ट्रेनच्या दारात उभं राहून, भरधाव वेगात बाईक चालवून अनेकजण स्टंट करत असतात. स्टंट करायच्या नादात अनेकांनी जीव गमावले आहेत. या सर्व घटना घडू नये यासाठी स्टंट न करण्याचे आवाहन नेहमी करण्यात येत असते.
महत्वाच्या बातम्या-
सोनं खरेदीची सुवर्णसंधी! गेल्या महिन्याच्या तुलनेत ५ हजार रुपयांनी स्वस्त सोनं, जाणून घ्या
दोन पोरांना सुचली मेन्युकार्ड वरुन भन्नाट आयडिया, आता करताय करोडोंची कमाई
बॅटरीच्या प्राॅब्लेममुळे वैतागलेत इलेक्ट्रीक वाहन खरेदी केलेले लोक; वाचा नेमकं काय घडतय..
देवेंद्र फडणवीसांना जशाच तसे उत्तर द्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.