राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे(Sitaram Kunte) यांनी ईडीला दिलेल्या जबाबात माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सीताराम कुंटे यांनी केलेल्या या खुलाशांमुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवल्याची माहिती सीताराम कुंटे यांनी ईडीला दिली आहे.(sitram kunte big statement on ex home minister anil deshmukh)
७ डिसेंबरला ईडीने माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा जबाब नोंदवला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस बदल्यांसाठी अनिल देशमुख अनधिकृत याद्या पाठवायचे, असा जबाब राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीला दिला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या १०० कोटी वसुलीच्या प्रकरणात तुरुंगात आहेत.
सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची राज्य सरकारने नेमलेल्या चांदीवाल आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्याना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. १०० कोटी वसुलीच्या प्रकरणात राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचाही जबाब ईडीने नोंदवला.
या जबाबात सीताराम कुंटे यांनी सांगितले की,अनिल देशमुख यांचा स्वीय सहायक संजीव पालांडे यांच्यामार्फत पोलिसांच्या बदल्यांच्या अनधिकृत याद्या माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात. या अनधिकृत याद्यांमध्ये कोणत्या पोलीस अधिकाऱ्याची कुठल्या जागी आणि कोणत्या पदावर बदली करायची, हे नमूद केलेले असायचे.
‘मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अधीन काम करत होतो. त्यामुळे मी त्या अनधिकृत याद्या स्वीकारण्यास नकार देऊ शकत नव्हतो’, असे पुढे या जबाबात सीताराम कुंटे यांनी सांगितले. पोलिसांच्या बदल्या या अनधिकृत याद्यांमार्फत करण्यात यायच्या,असा गौप्यस्फोट देखील सीताराम कुंटे यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वीच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना ओळखत नसल्याचा दावा चांदीवाल आयोगाच्या सुनावणी दरम्यान केला होता. पोलिस अधिकारी सचिन वाझे हा १०० कोटी वसूली प्रकरणात महत्त्वाचा दुवा आहे. आता सीताराम कुंटे यांनी दिलेल्या जबाबानंतर ईडी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कोणती कारवाई करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
महिन्याला १.७५ लाख कमावणाऱ्या युवा शेतकऱ्याने सांगितले गुपित, तरुणांना दिली शेती करण्याची प्रेरणा
प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी पोटच्याच मुलीला जंगलात सोडले; आईच्या नावाला काळीमा फासणारी घटना
“शरद पवारांनी खूप सोसलं आहे त्यामुळे तरुण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका ते कधीही घेणार नाहीत”