‘माझे काय व्हायचे ते होऊद्या, मात्र मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचे?’

अहमदनगर । राज्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक ठिकाणी रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. मात्र काही ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या कामामुळे त्याचे कौतुक होत असून रुग्णांची सोय होत आहे. यामध्ये आमदार निलेश लंके यांचे नाव सध्या सगळीकडे घेतले जात आहे.

नागरिकांचे मोठे हाल होत असल्यामुळे काही लोकप्रतिनिधींनी बोध घेऊन रुग्णांच्या व्यवस्थेसाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये रुग्णांसाठी सक्रिय काम करणारे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या कामाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी ‘माझे काय व्हायचे ते होऊ द्या, मात्र जर मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचे. त्यामुळे मी असुरक्षित असलो तरी चालेल पण माझी लोक सुरक्षित असली पाहिजेत, असा निर्धारच त्यांनी केला आहे.

त्यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये ते स्वतः बसून लक्ष ठेवून असतात. रुग्णांना काय हवं काय नको ते बघतात, तिथेत जेवतात, सगळ्या गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवतात. यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

त्यांनी गेल्यावर्षी शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारले होते. यामुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळाला होता. तर, आता यावर्षी देखील अजून एक कोविड सेंटर उभारले असून या सेंटर्सच्या कारभारावर लंके स्वतः लक्ष ठेवून आहेत.

अशाच प्रकारे राज्यातील इतर आमदारांनी या काळात कामे केली तर रुग्णांची होणारी गैरसोय थांबणार आहे. निलेश लंके यांनी इतर आमदारांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

ताज्या बातम्या

बॉलीवूड सरसावले; अक्षयकुमारची पत्नी ट्विंकल खन्ना थेट लंडनहुन आणणार ऑक्सिजन

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनाने निधन

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा विवाह झाला संपन्न; पहा लग्नाचे फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.