शेवटी बहिणीनेच वाचवले भावाचे प्राण! भावाचा जीव वाचवण्यासाठी केले यकृतदान, डॉक्टरही म्हणाले..

बहिण भावाचे नाते हे जगावेगळे असते हे सर्वांनाच माहिती असते. भाऊ बहिणीसाठी काहीही करू शकतो याची अनेक उदाहरणे तुम्ही वाचली असतील पण आजचे उदाहरण जरा वेगळे आहे. आपल्या भावाचा जीव वाचवण्यासाठी बहिण विदेशातून भारतात आली आणि तिने आपल्या भावाचा जीव वाचवला.

भारतात तिसरी लाट येणार अशी शक्यता वर्तवली जात होती. आंतरराष्ट्रीय विमानप्रवासावर निर्बंध असतानाही सुनिता गजेरा ही युएसमधून भारतात येण्यासाठी आतोनात प्रयत्न करत होती. शेवटी तिचे प्रयत्न फळाला आले आणि तिने आपल्या भावाला अवयवदान करून त्याचा जीव वाचवला.

सुरूतचा रहिवासी असलेला ३६ वर्षीय सुरेश देवानी हा मागील १ वर्षापासून लिव्हर सिरोसिस या भयानक आजाराने ग्रासलेला होता. त्याचा जीव वाचवण्यासाठी त्वरित प्रत्यारोपण करणे आवश्यक होते. सुरेशला जून २०२० मध्ये लिव्हर सिरोसिस झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते.

गेली १ वर्ष तो हॉस्पिटलच्या फेऱ्या मारत होता. त्याला वाचवण्याचा एकच मार्ग होता तो म्हणजे यकृत प्रत्यारोपण. पण महामारीदरम्यान अवयव दानाच्या प्रमाणात खुप मोठी घट झाली होती. सुरेशच्या पत्नीचे यकृत प्रत्यारोपणासाठी जुळत नव्हते.

जेव्हा सुरेशच्या युएसमधील बहिणीला याबद्दल माहिती मिळाली तेव्हा तिने स्वताहून पुढाकार घेतला. पण महामारीमुळे तिला विमानप्रवासाला परवानगी मिळत नव्हती. मागील अनेक महिन्यांपासून महामारीमुळे आंतरराष्ट्रीय विमानप्रवासावर बंदी घालण्यात आली आहे.

तसेच भारतात जीवंत व्यक्तीच्या अवयवदानाचे नियम खुप कडक आहेत. अवयवांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी हे कठोर नियम बनवण्यात आले आहेत. पण ही केस जरा वेगळी होती. फोर्टीस हॉस्पिटलमधील टीम्सनी यूएस एम्बेसी व एफबीआयकडून आवश्यक कागदपत्रे हस्तांतरित करण्यामध्ये आणि प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी डीएमईआर यांच्याकडून अंतिम मान्यता मिळवण्यामध्ये सुरेशच्या बहिणीला मदत केली होती त्यामुळे हे शक्य होऊ शकले.

मुलुंड येथील फोर्टीस हॉस्पिटलमधील लिव्हर ट्रान्सप्लान्ट ऍण्ड एचपीबी सर्जरी विभागाचे सल्लागार व प्रमुख डॉ. गौरव गुप्ता म्हणाले की, या केसमधून आपल्याला शिकवण मिळते की, परदेशात असले तरी नाते कधीच कमकुवत होत नाही. ही केस अवयवदानाच्या थोर कार्याला अधिक चालना देण्याचे उत्तम उदाहरण आहे. दरवर्षी भारतामध्ये जवळपास ५ लाख व्यक्तींना जीवनदायी अवयव प्रत्यारोपणाची आवश्यकता असते.

महत्वाच्या बातम्या
“बलात्कारीच बलात्काऱ्यांना सोडणार नाही असं म्हणत असतील तर हा जोक ऑफ द डे झाला”
“जेव्हा माझं गाणं प्रदर्शीत होतं, तेव्हा लोकं मला वेगळ्या चश्म्यातून पाहतात”; अमृता फडणवीसांनी व्यक्त केली खंत
‘ओ नारी मनहारी, सुकुमारी…’ प्रिया बापटचा मनमोहक रील व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकुळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.