‘आईने किचनमध्ये केलेल्या प्रयोगावर बहीण भावाने लावली आयडिया; आज करताय करोडोंची कमाई’

 

मुंबई |अनेकांना एखादी सवय लागली की ती सुटता सुटत नाही, आईस्क्रीमची सवय देखील अशी काहीशी तरी आहे. अनेकांना ऋतू कोणताही असो आईस्क्रीम हवीच असते.

मात्र आईस्क्रीम ठरला गोड पदार्थ त्यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास असतो ते हे आईस्क्रीम खाणे टाळत असतात. कारण आईस्क्रीम खाल्ल्याने शरीरातील साखर वाढते.

आपण आईस्क्रीम सुद्धा खाऊ शकलो आणि त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण सुद्धा वाढले नाही? तर तुम्ही म्हणाल की असे कसे शक्य आहे? हो, असे झाले आहे, आणि यामुळे एका बहीण भावाने थेट याचा व्यवसायच सुरू केला आहे.

मुंबईत राहणारे जश आणि पशमी शाह हे दोन भाऊ-बहीण आहे. या दोघांनीही MBA चे शिक्षण घेतलेले आहे. जश शाह यांना प्रोटिनची प्रचंड आवड आहे. ते कुठेही भारतात किंवा भारताबाहेर गेले तर तिथून प्रोटीन घेऊन येतात.

या प्रोटिनमुळे त्यांना आईस्क्रीम बनवण्याची आयडिया सुचली होती. खरं तर ही आयडिया त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाली.  त्यानंतर त्यांनी याचा थेट व्यवसायासाठीच विचार केला.

एकदा जश आणि पशमी हे दोघेही जिमला जाऊन आलेले होते. त्यानंतर घरी आल्यावर त्यांना आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली.  आईने त्यांना आईस्क्रीम बनवून दिले पण ते आईस्क्रीम जश याने आणलेल्या प्रोटीन बनवले होते.

आईने बनवलेली ही आईस्क्रीम त्यांना प्रचंड आवडली. विशेष म्हणजे यात आईने साखर घातलेली नव्हती. यानंतर त्यांना आपण याचा व्यवसाय करू शकतो अशी आयडिया सुचली.

 

परिवारातील काही सदस्यांकडून पैसे उधार घेऊन दहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीत, घरातील ३ लोकांच्या टीमकडून २०१८ मध्ये एक ‘Get-A-Whey’ नावाचा आईस्क्रीमचा ब्रँड तयार केला.

तसेच आईस्क्रीम तयार करताना आईस्क्रीमला गोडपणा येण्यासाठी त्यांनी साखरे ऐवजी Organic Sweetener, Erythritol यांचा वापर केला. एका डीप फ्रीझर मध्ये पूर्ण आईस्क्रीम तयार केले.

सध्या हे आईस्क्रीम फक्त मुंबई आणि पुणे येथील एकूण शंभर रिटेलर्स मध्ये विकले जात आहे. त्याच सोबत जश आणि पशमी शाह यांनी वेबसाइटवरून सुद्धा आईस्क्रीमची विक्री सुरू केली आहे.

तसेच Swiggy, Zomato सारख्या डिलिव्हरी कंपनी सोबत टाय-अप  केले असून त्यामुळे त्यांना ग्राहक वाढवण्यासाठी याचा फायदा झाला आहे. तसेच त्यांनी यासाठी वेबसाईट देखील सुरू केली आहे.

सध्या Get-A-Whey ही आईस्क्रीम मुंबई, पुणे, हैद्राबाद, बँगलोर, सुरत, नागपूर, अहमदाबाद, चेन्नई आणि दिल्ली या शहरांमध्ये पोहचली आहे. तसेच त्यांची आयडिया यशस्वी झाली असून त्यांच्या मागच्या वर्षीचा टर्न ओव्हर जवळपास अडीच कोटी रुपये एवढा आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.