स्वतःच्या कामगिरीवर खुश! मोहम्मद सिराजने स्वतःलाच दिलं जबरदस्त गिफ्ट

ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचे शिलेदार भारतात परतले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऐतिहासिक कामगिरीनंतर मायदेशी परतलेल्या सिराजने स्वतःच एक जबरदस्त गिफ्ट दिले आहे.

ऑस्ट्रेलियावरील ऐतिहासिक विजयानंतर सिराजनं निळ्या रंगाची बीएमडब्ल्यू (BMW) ही महागडी कार खरेदी केली. “Alhamdullilah” म्हणजेच अल्लाहच्या कृपेनं…. असं लिहित त्यानं सोशल मीडियावर याचा एक लहानसा व्हिडीओ पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला.

सोशल मीडियावर आता त्याचीच चर्चा रंगली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज भारतात परतल्यावर घरी न जाता, एअरपोर्टहून थेट दफनभूमीत गेला. तिथे जाऊन त्याने वडिलांच्या कबरीचे दर्शन घेतले. सिराजचे वडील मोहम्मद घौस यांचे २० डिसेंबरला निधन झाले.

सिराज ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. सिराजने या ४ सामन्यातील मालिकेतील ३ सामन्यांमध्ये एकूण १३ विकेट्स घेतल्या. भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो अव्वल स्थानावर होता.

जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला

धक्कादायक! शेतकरी आंदोलनातील चार शेतकरी नेत्यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा कट

बाळासाहेब ठाकरे यांच्या एका धमकीनंतर शाहरुख खानची हवा झाली होती टाईट मग..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.