“साहेब सोनं नको पण बैल वाचवा”, शेतकऱ्याचे प्रेम पाहून डॉक्टरांच्या आले डोळ्यात पाणी..

बीड । शेतातील कामे करण्यासाठी शेतकऱ्यांचा महत्वाचा जोडीदार म्हणजे बैल. त्यामुळे त्याच्याबर शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे नाते असते.

याच जिव्हाळ्याचा प्रत्यय बीड जिल्ह्यातील वायरा या गावात आला आहे. पोळा सणाच्या दिवशी एका गृहिणीने बैलांचे औक्षण करून सोन्याचे मंगळसूत्र बाजुला ठेवले असता, ते नकळत बैलाने खाल्ले. परंतु मालकास याची खात्री नव्हती.

शेवटी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने बैलाचा एक्स-रे काढण्याचे ठरले व बैलास मांडवगण फराटा, ता शिरूर, जि. पुणे येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यात आले. एक्स-रे काढल्यानंतर मंगळसूत्र पोटात असल्याचे निदान झाले.

त्यानंतर बैलाच्या पोटातील मंगळसूत्र शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्याचे ठरले होते. डॉ भारती हे शस्त्रक्रिया करणार होते. मात्र बैलाचे मालक दादासाहेब झानजे हे लाडक्या बैलाच्या शस्त्रक्रियेसाठी तयार होत नव्हते.

शेतकऱ्याचे आपल्या बैलावर किती प्रेम असते, याचा प्रत्यय सोनं बैलाच्या पोटातचं आहे आणि शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे समजल्यावर त्यांच्या डोळ्यात आलेल्या पाण्यावरून आला. यावेळी त्यांचा आवाज गहिवरला.

त्यांनी सांगितले की, डॉक्टर साहेब मंगळसूत्र फक्त ५० ते ६० हजाराचे आहे, माझ्या बैलाला त्याचा त्रास होणार नसेल आणि माझा बैल जर शस्त्रक्रियेनंतर अधू होणार असेल तर सोने पोटातच राहुद्या.

याबाबत डॉ. दिपक औताडे म्हणाले, याला म्हणतात प्रेम, खरे प्रेम काय असते हे फक्त शेतकऱ्यांकडूनच शिकावे, मी त्या पशुपालकास शस्त्रक्रियेसाठी तयार केले. कारण बैलाला काहीही होणार नव्हते.

आज बैलाची शस्त्रक्रिया देखील ठरली होती. मात्र, सुदैवाने आज सकाळीच ते मंगळसूत्र बैलाच्या रवंथ करण्यातून बाहेर पडले. शक्यतो असे कधी घडत नाही, कारण जड वस्तू पोटात खाली बसते व रवंथ करण्यामुळे वर येत नाही, अगदी क्वचित घडणारी घटना आहे.

याबाबत बैलाचे मालक दादासाहेब झानजे यांनी मला फोन करून सांगितले, त्यावेळी त्यांना झालेला आनंद आवाजावरून लक्षात येत होता. यावेळी डॉक्टरांना देखील गहिवरून आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.