फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी आजपर्यंत लग्न केले नाही. अनेक अभिनेते असेही अभिनेते आहेत ज्यांनी लग्न केले. पण लग्नानंतर काही दिवसांनीच या कलाकारांचे घटस्फोट झाले. घटस्फोटानंतर त्यांनी परत लग्न केले नाही.
अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षे राज्य केले आहे. त्यांनी आपल्या सुंदरतेने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्री त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र आनंदी राहू शकल्या नाहीत.
त्यांनी लग्न केले. पण लग्न केल्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर त्यांनी परत कधीच लग्न करण्याचा विचार केला नाही. आज त्या आपल्या मुलांसोबत सुखी सिंगल मदर म्हणून राहत आहेत. जाणून घेऊया अशाच अभिनेत्रींबद्दल.
१)करिष्मा कपूर – ९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये करिष्मा कपूरचे राज्य होते. करिष्माने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिकून घेतली होती. करिअरच्या टॉपवर असताना करिष्माचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते.
पण २००३ मध्ये करिष्माने बिजनेस मॅन संजय कपूरसोबत लग्न केले. लग्नानंतर करिष्माला दोन मुलं झाली. पण काही वर्षांनी करिष्मा तिच्या नवऱ्यापासून वेगळी झाली. घटस्फोटानंतर करिष्माने परत लग्न केले नाही.
घटस्फोटानंतर करिष्माचे अफेअर एका बिजनेस मॅनसोबत होते. पण करिष्माची दोन्ही मुलं मोठी झाली आहेत. त्यांचा विचार करून करिष्माने परत लग्न केले नाही. आज करिष्मा तिच्या दोन्ही मुलांसोबत सुखी आहे. ती सध्या तिच्या मुलांच्या करिअरवर लक्ष देत आहे.
२)अमृता सिंग – ८० आणि ९० च्या दशकात आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अमृता सिंग देखील बॉलीवूडची सिंगल मदर आहे. अमृताने सैफ अली खानसोबत लग्न केले. लग्नानंतर ती अभिनय क्षेत्रापासून लांब गेली आणि तिने पूर्ण लक्ष तिच्या कुटुंबावर दिले.
पण अमृताचा संसार जास्त काळ टिकू शकला नाही. सैफ अली खान आणि अमृता सिंगचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अमृताने तिचे सगळे लक्ष आपल्या दोन्ही मुलांवर दिले आणि दुसरे लग्न केले नाही. आपल्या मुलांसाठी अमृताने आपले करिअर देखील सोडले होते.
३)महिमा चौधरी – महिमा चौधरीने तिच्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पण महिमाचे करिअर जास्त काळ टिकू शकले नाही. खुप कमी वेळात तिचे करिअर संपले होते.
तिचे वैवाहिक आयुष्य देखील खुप कमी वेळात संपले होते. महिमाने बिजनेस मॅन बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले होते. पण खुप कमी दिवस हे लग्न टिकू शकले आणि या दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर महिमा चौधरी आज एकटी तिच्या मुलीचा सांभाळ करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
संजय दत्तच्या गर्लफ्रेंडला किस केल्यामुळे धर्मेंद्रने खाल्ला होता संजू बाबाचा मार
९० च्या दशकातील ‘हा’ अभिनेता तुम्हाला आठवतो का? शेवट होता अतिशय वाईट
धरम पाजीच्या रागाला बघून श्रीदेवी लाईव्ह शोमधून पळून गेल्या होत्या