सिंगमफेम खलनायक अनंत जोग यांची बायको सुद्धा आहे अभिनेत्री! दिसायला आहे खूपच सुंदर; पहा फोटो

अनंत जोग यांनी हिंदी चित्रपट असो किंवा मराठी चित्रपट असो यामध्ये दमदार अशा भूमिका केलेल्या आहेत. त्यांना अनेक लोक खलनायकाच्या भूमिकेत ओळखतात तर कधी हळव्या मनाच्या भूमिकेमूळे त्यांना ओळखतात.

बऱ्याच चित्रपटात त्यांनी खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत तर काही मराठी मालिकांमध्ये त्यांनी अतिशय हळव्या भूमिका निभावल्या आहेत. राउडी राठोर, नो एंट्री, कच्ची सडक, लाल सलाम,दहेक, रिस्क, सिंघम अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

चित्रपटासोबतच त्यांनी मराठी मालिकांमध्ये सुद्धा अनेक भूमिका साकारल्या आहेत. अनंत जोग यांनी एका मराठी अभिनेत्री सोबतच विवाह केला त्यांच्या पत्नीचे नाव उज्वला जोग आहे.

उज्वला जोग यांना देखील टीव्हीवरील उत्कृष्ठ अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं ‘कुंकू लावते माहेरचं’, सौभाग्य कांकन’, ‘ नवरा बायको’ अशा अनेक मालिकेत त्यांनी काम केले आहे. अनंत आणि उज्वला जोग यांना क्षिती जोग नावाची मुलगी देखील आहे.

क्षिती देखील उत्तम अभिनेत्री आहे. तिची ‘दामिनी’ या मालिकेतील इंस्पेक्टरची भुमिका विशेष गाजली ‘तु तिथे मी’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मराठी मालिकेत तिने काम केले आहे ‘घर की लक्ष्मी बिटीया’, ‘साराभाई vs साराभाई’ , या हिंदी मालिकेत देखील तिने उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.

क्षिती जोग हिने २०१२ साली हेमंत ढोमे याच्या सोबत लग्न केल . हेमंत ढोमे हा मराठी चित्रपटातील उत्तम अभिनेता डायरेक्टर म्हणून परिचित आहे. त्याने ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटाचे लेखन तसेच दिग्ददर्शनही केले आहे.

 

महत्वाच्या बातम्या
सिनेमातली लव्हस्टोरी यांच्यापुढे फिकी आहे; वाचा ऋषीकेश आणि प्राचीची अफलातून प्रेमकथा
प्रभू रामचंद्रांमधील इंजीनियरिंगचे गुण, रामचरितमानस, ध्यान, महाभारत अभ्यासक्रमात समाविष्ट करणार
मोठी बातमी! भारतीय रेल्वेत मोठे बदल होणार, खाजगी कंपन्या भाड्याने घेणार रेल्वे
सूनेने केली सासूला जबर मारहाण, मुलगा बघतच राहीला; सूनेच्या या घाणेरड्या कृत्यावर नेटकरी संतापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.