Share

Udit Narayan : गायक उदित नारायण यांना आला हृदयविकाराचा झटका? मॅनेजरने सांगीतले व्हायरल पोस्टमागील सत्य

Udit Narayan

Udit Narayan : सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र, आता याबाबत खुलासा झाला आहे.

उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. चाहत्यांना त्यांची काळजी वाटत होती. उदित नारायण यांना खरंच हृदयविकाराचा झटका आला आहे का? असा प्रश्न त्यांना पडला होता.

यावर उदित नारायण यांच्या मॅनेजरने प्रतिक्रिया दिली आहे. ही बातमी खोटी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच उदित नारायण यांची प्रकृती अगदी उत्तम असून त्यांना काहीही झाले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी पसरल्यानंतर त्यांना अनेक फोन येत होते. त्यामुळे ते अस्वस्थ असल्याचेही त्यांच्या मॅनेजरने सांगितले. परंतु, कुणीतरी ही अफवा पसरवत असल्याचे त्यांच्या मॅनेजरने सांगितले आहे.

तसेच ही अफवा नेपाळहून पसरवली जात असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी ज्या क्रमांकावरून पसरवली जात आहे, त्याचा कोड नंबर हा नेपाळचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उदित नारायण यांच्याविषयी पसरलेल्या या बातमीमुळे त्यांचे चाहते चिंता व्यक्त करत होते. मात्र, आता उदित नारायण यांना काहीही झालेले नसून ते ठीक असल्याची माहिती त्यांच्या मॅनेजरने दिली आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या
पाकिस्तानी तरूणांच्या प्रेमात पडल्या होत्या या; बॉलिवूड अभिनेत्री, एकावर तर ४ जणी होत्या फिदा
जेव्हा तिला भारतरत्न मिळाला तेव्हा.., लतादीदींच्या मृत्यूनंतर भाऊ हृदयनाथ मंगेशकरांचा मोठा खुलासा
आमिर खान आणि जुही चावलावर झाली होती दगडफेक; असा वाचवला होता स्वत:चा जीव
Ekanth Shinde : ‘मुख्यमंत्री शिंदेंचे भाषण फारच सुमार, वत्कृत्व आणि लोकांचे प्रेम विकत आणता येत नाही’

ताज्या बातम्या इतर बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now