Share

या’ स्पर्धकाला मंचावर पाहताच ढसाढसा रडू लागली नेहा कक्कर; कारण ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आज तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या नेहा कक्करने(Neha Kakar) बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय गायिका आहे. तिने गायलेल्या प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळते. गायिका नेहा कक्करने अतिशय संघर्ष करत हे स्थान मिळवले आहे. तिने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. (singer neha kakar crying in indian idol)

गायिका नेहा कक्कर इंडियन आयडल या रिअॅलिटी शोमध्ये जज आहे. या शोमधील एका एपिसोडमध्ये गायिका नेहा कक्कर आपल्या भूतकाळातील आठवणींमुळे भावूक झाली होती. यावेळी गायिका नेहा कक्करला तिचे जुने दिवस आठवले. संघर्षाच्या काळात नेहा कक्कर वडिलांसोबत जागरणात गाणी गात असे.

ही आठवण गायिका नेहा कक्करने इंडियन आयडल या रिअॅलिटी शोमध्ये सांगितली. एकदा इंडियन आयडल या सिंगिंग रिअॅलिटी शोच्या ऑडिशनमध्ये एक मुलगा स्टेजवर आला. त्याला पाहून नेहा कक्करला तिचे जुने दिवस आठवले. नेहाने त्या मुलाला नाव विचारलं. त्याने सागर असं नाव सांगितले. त्यावेळी नेहा कक्करने त्याला ओळखले नाही.

त्या स्पर्धकाने वडिलांचे नाव सांगितल्यानंतर नेहा कक्करला रडू आवरले नाही. त्या स्पर्धकाच्या वडिलांनी नेहा कक्करच्या कुटुंबियांना त्यांच्या संघर्षाच्या काळात मदत केली होती. नेहा कक्करने सांगितले की, “जेव्हा मी आणि सोनू, दीदी जागरणात गाणे गायचो. त्यावेळी आम्ही खूप गरीब होतो. त्यावेळी आमचे वडील देखील जागरणात गाणी गायचे.”

“त्यावेळी सागरचे वडील म्हणजेच जगदीश चुग यांनी आम्हाला खूप मदत केली. सागरचे वडील आम्हाला भरवायचे. आम्ही काही दिवस त्यांच्या घरी राहिलो. आम्हाला त्यांनी खूप मदत केली. आज मी जे काही आहे, ती त्यांच्यामुळेच आहे”, असे म्हणत गायिका नेहा कक्कर भावुक झाली होती. यावेळी नेहा कक्करने वडिलांच्या आठवणीत स्पर्धक सागरला गाणे म्हणण्यास सांगितले.

सागरने गाणे म्हणण्यास सुरवात करताच गायिका नेहा कक्करच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गायिका नेहा कक्करने अनेक रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून भूमिका बजावली आहे. २००८ मध्ये गायिका नेहा कक्करचा पहिला अल्बम ‘नेहा द रॉकस्टार’ प्रदर्शित झाला होता. या अल्बमला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती.

महत्वाच्या बातम्या :-
सेक्रेड गेम्स’फेम अभिनेत्रीचा गौप्यस्फोट; माझ्या काकांनी मला पॅंट काढायला लावली अन्…
“काकांनी माझे अडीच वर्षे लैंगिक शोषण केले”, बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला दुःखद अनुभव
केकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! केकेचे अखेरचे गाणे ‘या’ तारखेला होणार रिलीज

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now