प्रसिद्ध गायक केके यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे निधन झाले. गायक केके ५३ वर्षांचे होते. कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये केके यांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमादरम्यान गायक केके (KK) यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण रुग्णालयात डॉक्टरांनी गायक केके यांना मृत घोषित केले. (singer KK fan facbook post give inforamtion about event )
https://www.facebook.com/100001995014862/videos/428711758716692/
आता या कार्यक्रमाचे वेगवेगळे व्हिडिओ समोर येत आहेत. यात काही प्रेक्षकांनी कार्यक्रमादरम्यान केके चे व्हिडिओ काढले आहेत. सध्या एक फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. या फेसबुक पोस्टमध्ये केकेचे पाच व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये गायक केके ‘हाय मर जावा यहीं पै’ असे म्हणताना दिसत आहे.
https://www.facebook.com/100001995014862/videos/541195641072894/
या फेसबुक पोस्टमध्ये गायक केके यांच्या मृत्यूची कारणे देखील सांगितली आहे. ऋषी राज नावाच्या एका युजरने ही फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. या ऑडिटोरिअममध्ये प्रेक्षकांची संख्या गरजेपेक्षा जास्त होती. २२०० प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या ऑडिटोरिअममध्ये ५००० प्रेक्षक उपस्थित होते. तसेच ऑडिटोरिअममधील एसी देखील सुरु नव्हता, असा आरोप त्या युजरने केला आहे.
https://www.facebook.com/100001995014862/videos/1231048251037120/
यातील पहिल्या व्हिडिओमध्ये ऑडिटोरिअम संपूर्ण भरले होते. ऑडिटोरिअममधील एसी देखील काम करत नव्हता, असा आरोप करण्यात आला आहे. एसी काम करत नसल्यामुळे केकेला श्वास घेण्यास त्रास होत होता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये केकेला काही जण ऑडिटोरिअम बाहेर घेऊन जाताना दिसतात. या व्हिडिओमध्ये केके पूर्ण अशक्त दिसत आहे.
https://www.facebook.com/100001995014862/videos/545680263824836/
तिसऱ्या व्हिडिओत प्रेक्षकांमधील काही जण आग प्रतिबंधक साधनांसोबत खेळताना दिसत आहेत. तर चौथ्या व्हिडिओमध्ये केके शेवटचं गाणं गाताना दिसत आहे. पाचव्या व्हिडिओमध्ये केके ‘हाय मर जावा यहीं पै’,असे म्हणताना दिसत आहे. या पाच व्हिडिओंची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://www.facebook.com/100001995014862/videos/1184275795665364/
गायक केकेच्या मृत्यूमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी, गायकांनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. राजकीय नेत्यांनी देखील गायक केके यांना श्रद्धांजली वाहिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गायक केके यांच्या निधनावर ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
नंदीपासून ८३ फुटावर शिवलींग, भिंतीवर त्रिशुळाच्या खुना; ज्ञानवापीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल
गायक केकेचा मृत्यू नैसर्गिक नव्हे तर घातपात; डोक्यावर जखमांचे व्रण आढळल्याने उडाली खळबळ
वा रे पठ्ठ्या! तिकीटाच्या 2 रुपयांसाठी रेल्वेला खेचलं कोर्टात, शेवटी केस जिंकत मिळवले अडीच कोटी






