प्रसिद्ध गायक केके यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे निधन झाले. गायक केके ५३ वर्षांचे होते. कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये केके यांचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कॉन्सर्ट दरम्यान गायक(Singer) केके यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण रुग्णालयात डॉक्टरांनी गायक केके यांना मृत घोषित केले. (singer KK famous 5 south film song )
केके यांनी बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. केके यांनी हिंदी चित्रपटांसाठी २०० हून अधिक गाणी गायली आहेत. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातही त्यांनी गाणी गायली आहेत. याशिवाय बचना-ए-हसीनो, काइट्स, जन्नत आणि गँगस्टर यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी गाणी गायली आहेत.
केके यांनी साऊथ चित्रपटांमध्ये देखील गाणी गायली आहेत. केकेने प्रभू देवा आणि काजोलने भूमिका केलेल्या एका दाक्षिणात्य चित्रपटासाठी गाणे गायले आहे. या गाण्याचे नाव ‘स्ट्रॉबेरी कन्ने’ असे आहे. हे गाणं ‘मिनसारा कनावू’ या तामिळ चित्रपटातील आहे. प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.
याशिवाय केकेने ‘गिल्ली’ या तामिळ चित्रपटात देखील गाणे गायले आहे. अभिनेता विजय आणि अभिनेत्री तृषा कृष्णन यांच्यावर जे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. संगीतकार विद्यासागर यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. अभिनेता धनुषची भूमिका असलेल्या ‘कुट्टी’ या तामिळ चित्रपटात केकेने गाणं गायलं आहे. या चित्रपटातील ‘फील माय लव्ह’ हे केकेने गायलेलं गाणं खूप लोकप्रिय झालं होतं.
देवी प्रसाद यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. अभिनेता सूर्या आणि अभिनेत्री जोतिका यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘काखा काखा’ या तामिळ चित्रपटात केकेने ‘उयिरंन उडरे’ हे गाणं गायलं आहे. याव्यतिरिक्त केकेने ‘आथी’ या तामिळ चित्रपटात देखील गाणं गायलं आहे. या चित्रपटात अभिनेता विजय आणि अभिनेत्री तृषा कृष्णन यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.
https://youtu.be/WfXNaiFHs8E
महत्वाच्या बातम्या :-
सरकारी अधिकाऱ्याने कार्यालयात लावला ओसामा बिन लादेनचा फोटो; म्हणाला, हाच माझा आदर्श..
आॅक्सफर्ड विद्यापीठाने कार्यक्रम रद्द करताच संतापले अग्निहोत्री, म्हणाले, हा तर मोदींचा अपमान…
अनोळखी मुलीला चहलने केला मेसेज, मुलीने ऍक्शन घेताच मागावी लागली माफी, पहा फोटो