कोणी गाणं गायला हवे आणि कोणी गाऊ नये, हे ठरवणारा सलमान खान कोण?

 

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर नेपोटीझमच्या वादाला तोंड फुटले आहे.

सुशांत सिंग राजपूत नेपोटीझमच्या विळख्यात अडकून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे, असे अभिनेत्री कंगना राणावतने म्हटले आहे.

नेपोटीझम बाबत गायक सोनू निगमने देखील आवाज उठवला होता. आता त्यानंतर गायक अभिजित भट्टाचार्यने अभिनेता सलमान खानबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

एखादे गाणे कोणी गायला हवे आणि कोणी गाऊ नये, हे ठरवणारा सलमान खान कोण आहे, असे अभिजित भट्टाचार्य म्हणाले आहेत.

तसेच ९० च्या दशकात असे अजिबात व्हायचे नाही, आता मात्र याचे प्रमाण वाढले आहे आणि हे खूपच दुःखजनक आहे.

त्यावेळी संगीत क्षेत्राची एवढी दयनीय अवस्था नव्हती. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कंपोजर ठरवायचे चित्रपटात गाणे कोण गाणार आहे.

पण आता काळ बदला आहे, आता तर काही कंपन्या किंवा त्यातील कलाकार ठरवतात या चित्रपटात गाणे कोण गाणार आहे, असेही अभिजित भट्टाचार्य म्हणाले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.