एक चुकीचा शब्द पडला महागात, ‘तारक मेहता..मधील बबितावर विविध ठिकाणी गुन्हा दाखल; जामीनही नाही मिळणार

छोट्या पडद्यावरील ‘ तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेविषयी जास्त काही सांगण्याची गरज नाही. या मालिकेनी लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. तसेच या मालिकेतील पात्र सतत कोणत्याना कोणत्या विषयाला घेऊन चर्चेत असतात. या मालिकेतील बबिता कायम चर्चेत असते.

बबीताची भूमिका अभिनेत्री मुनमुन दत्ता साकारताना दिसत आहे. मुनमुन ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकताच मुनमुनने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी सोशल मीडियाद्वारे तिला अटक करण्याची मागणी केली होती.

जसे की आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, ‘शब्द हे शत्र आहे ते जपून वापरे पाहिजे’. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात बोलताना जपूनच बोलले पाहिजे किवा विचार करून बोलले पाहिजे. कधी कधी आपल्या सहज बोलण्याचा समोरच्याच्या मनावर खोलवर परिणाम झालेला दिसतो.

लवकरच मुनमुन दत्ता यूट्यूबर दिसणार आहे. सर्वांसाठी तिने रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ‘मी लवकरच यूट्यूबर दिसणार आहे. त्यासाठी मला सुंदर दिसायचे आहे. मला भंगी सारखे दिसायचे नाही’ असे मुनमुन व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.

तिने आपल्या व्हिडिओ भंगी हा शब्द वापरला, हा शब्द वापरल्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या असा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. हरियाणामधील हांसी शहरात मुनमुनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नॅशनल अलायंल फॉर दलित ह्यूमन राईटस् चे कार्यकर्ते रतज कलसन यांनी मुनमुन विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मुनमुनवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे तिच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. देशीतील विविध शहरांमध्ये तिच्याविरोधात गुन्हे दाखल होत आहेत. जालंधरमध्ये देखील दलित संघटनांनी एकत्र येत मुनमुनविरोधत गुन्हा दाखल केला असून लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केलीय. मुनमुनवर अजामीनपात्र गुन्हा दाखल गुन्हा दाखल झाल्याने अटक झाल्यास तिला जामीन मिळू शकत नाही.

आपली चूक समजताच मुनमुनने ट्विटरद्वारे माफी मागितली आहे. तीच अस म्हणणे आहे की, व्हिडीओमध्ये मी वापरलेल्या शब्दाचा वेगळा अर्थ काढला जात आहे. कोणाच्या भावना दुखावण्यासाठी किंवा धमकी देण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या भाषेच्या अडथळ्यामुळे मला या शब्दाबद्दलचे चुकीचे ज्ञान होते.

https://twitter.com/moonstar4u/status/1391676755853733891/photo/2

मला या शब्दाचा अर्थ कळताच मी व्हिडीओमधून तो भाग काढून टाकला. मी प्रत्येक जात, पंथ आणि लिंगाच्या व्यक्तींचा आदर करते. समाजात किंवा राष्ट्रासाठी त्यांचे अपार योगदान आहे याची मी कबुली देते. मी नकळतपणे वापरलेल्या शब्दासाठी मनापासून माफी मागते’ या आशयाची पोस्ट तिने केली आहे. मुनमुनने माफी मागून देखील तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

हे ही वाचा-

आजीबाईंना सलाम! कोरोना काळात ज्येष्ठांना आधार, देतात दीडशे जणांना दोन वेळचे मोफत जेवण

फुलाला सुगंध मातीचा मालिकेत होणार प्रसिद्ध खलनायकाची एन्ट्री 

भावाचा नाद नाय! हाय हिल्स घालून असा धावला की थेट वर्ल्ड रेकॉर्डच केला; पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.