Homeआरोग्यजाणून घ्या.. कोणतीही मेहंदी किंवा कलर न लावता नैसर्गीकरित्या केस काळे करण्याचा...

जाणून घ्या.. कोणतीही मेहंदी किंवा कलर न लावता नैसर्गीकरित्या केस काळे करण्याचा उपाय..

अनेकांचे केस वय कमी असतानाही पांढरे झाले आहेत. याला अनेक कारणे आहेत. जसे की, वाढलेले प्रदूषण किंवा या धावपळीच्या जीवनात आलेले चुकीचे खाणे पिणे. काहींना कामामुळे स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही.

मग त्यात आपण कसे दिसतो आपल्या शरीरावर आपण जे खातोय त्याचा काय परिणाम होतोय याकडे खूप दुर्लक्ष होते. आपण नुसते पैशांच्या मागे धावत असतो. पण त्याचा आपल्या आरोग्यावर खूप परीणाम होतो.

या सर्व गोष्टींचा आपल्या त्वचेवर आणि सर्वात महत्वाचे आपल्या केसांवर खूप परिणाम होतो. अनेक जणांचे केस पांढरे झालेले आहेत किंवा गळायला लागले आहेत. पण त्यामुळे लवकरच म्हातारे झाल्यासारखे दिसतो. कारण आपल्या त्वचेवरसुद्धा त्याचा परिणाम झालेला असतो.

पांढऱ्या केसांची समस्या आजच्या काळात खूप सर्वसामान्य झाली आहे. असे कितीतरी लोक आहेत जे पांढऱ्या केसांच्या समस्येवर उपाय शोधत असतात. मग ते डॉक्टरांकडे जातात, गोळ्या घेतात, वेगवेगळे तेल लावतात, शॅम्पू लावतात. कोणी मेहंदी लावतो तर कोणी हेअर डाय.

पण असे करण्याची गरज नाही. कारण आम्ही पांढऱ्या केसांवर खूप सोपा उपाय सांगणार आहोत. त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही. अगदी स्वस्त व सोपा उपाय आहे. तुरटी सर्वांना माहीत आहे. तुरटीमध्ये अनेक गुणधर्म असतात.

तुरटीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट सगळ्यात जास्त असते. आपल्या शरीरातील ३०० पेक्षा जास्त enzymes ला मॅग्नेशियम सल्फेट नियंत्रित करत असते. तर सर्वात आधी तुम्हाला फक्त गुलाबपाणी आणि तुरटीची गरज आहे.

सगळ्यात आधी तुरटीची पावडर करून घ्या. मग ती पावडर गुलाबपाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ते मिश्रण नीट घोळून घ्या. नंतर ती पेस्ट तुमच्या पांढऱ्या केसांना लावा. तर आठवडाभर तुम्ही ही पेस्ट तुमच्या केसांना लावली तर तुमचे पांढरे केस काळे होऊन जातील.

खूप सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. यात तुमच्या केसांना कसलीही इजा होणार नाही. पण कोणतीही गोष्ट करण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना याबद्दल विचारू शकता. ते तुम्हाला याबद्दल संगतीलच. जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर पुढे शेअर करायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
ना गाडी, ना बॉडीगार्ड ना कसली फेअरवेल पार्टी, बदली झाल्यावर कलेक्टर स्वत: बोऱ्या बिस्तर घेऊन गेले निघून
मुलाचे चित्रपट कमवतात ४०० कोटी परंतु वडील आजही चालवितात बस; जाणून घ्या कारण
मुंबईतील सर्वात महागड्या भागात उभा राहणार राकेश झुनझुनवालांचा महाल, किमंत वाचून हैराण व्हाल
ड्रायव्हरचा मुलगा एकाच चित्रपटाने झाला साऊथ सुपरस्टार, कमी वयातच कमावली प्रचंड संपत्ती