जगातली सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर, एकाच चार्जमध्ये धावते २४० किमी; किंमत फक्त..

मुंबई | देशात गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने शंभरी गाठली आहे. अशात बेंगळुरू येथील स्टार्ट-अप कंपनी सिंपल एनर्जी आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर मार्क 2 देशांतर्गत बाजारात आणणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही स्कूटर १५ ऑगस्टला बाजारात दाखल होणार आहे. कंपनीने ऑफर केलेल्या फ्लॅगशिप मॉडेल आणि आतापर्यंत भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या स्कूटर्सच्या तुलनेत ही सर्वोच्च ड्रायव्हिंग रेंज देणारी स्कूटर असणार आहे.

नुकताच कंपनीने सोशल मीडियावर या स्कूटरच्या लॉन्चचा टीझरही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये स्कूटरच्या लॉन्चची तारीख जाहीर करण्यात आली आहे. सिंपल एनर्जी कंपनी मार्क २ ही स्कूटर वेगवेगळ्या टप्प्यात बाजारात आणणार आहे. अलीकडेच कंपनीने त्यांच्या या प्रोजेक्टमध्ये मोठी गुंतवणूक केली असून त्यामुळे या प्रोजेक्टमध्ये मोठी वाढ झाली आहे.

नवीन स्कूटर कशी असेलः
मार्क २ या स्कूटरमध्ये कंपनी ४.८ किलोवॅट क्षमतेची बॅटरी पॅक वापरत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही स्कूटर एकादा चार्ज केल्यास २४० किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते.

एवढेच नाही तर वेगाच्या बाबतीत ही स्कूटर इतर प्रतिस्पर्धी गाड्यांना पाठीमागे टाकत आहे. स्कूटर ० ते १०० किलोमीटर प्रति तास वेग फक्त ३.६ सेकंदात पकडू शकते. या स्कूटरची टॉप स्पीड ताशी १०० किलोमीटर आहे.

या स्कूटरमध्ये कंपनीने मिड ड्राईव्ह मोटरसह पोर्टेबल बॅटरी दिली आहे. याशिवाय टचस्क्रीन इन्फोटेनमेंट इन्स्ट्रुमेंट स्क्रीन आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सारखी स्मार्ट फीचर्सदेखील स्कूटरमध्ये दिली गेली आहेत. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये मार्क १ च्या प्रोटोटाइपने २३० किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज दिली. यातही कंपनीने ४ किलोवॅट क्षमतेची बॅटरी वापरली होती.

किंमत काय असेल:
लॉन्च होण्यापूर्वी या स्कूटरच्या किंमतीबद्दल काही अंदाज लावणे कठीण आहे. पण मीडिया रिपोर्टनुसार स्कूटर बाजारात १ लाख १० हजार ते १ लाख २० हजार रुपयांपर्यंत येऊ शकते. मार्क २ ही लांब पल्ला गाठणारी स्कूटर बाजारात आल्यानंतर प्रामुख्याने बजाज चेतक, टीव्हीएस आयक्यूब आणि अ‍ॅथर 450x सारख्या मॉडेल्सशी ती स्पर्धा करेल.

महत्वाच्या बातम्या-
सरकार दिलेले सल्ले मानत नाही; मोदी सरकारवर गंभीर आरोप करत कोरोना संशोधन गटाच्या प्रमुखांचा राजीनामा
कोरोना रुग्णांवर आता प्लाझ्मा थेरेपीने उपचार होणार नाही; आयसीएमआर आणि एम्सचा मोठा निर्णय
रविना टंडन झाली आज्जी, तिच्यात आणि मुलीत आहे ११ वर्षाचा फरक; जाणून घ्या पूर्ण किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.