मुलीसाठी काहीपण! हाताला मिळेल ते काम करुन ही उच्चशिक्षित महिला करतेय मुलीचा सांभाळ

 

फेब्रुवारी सुरु झाला की सगळीकडे गुलाबी वातावरण निर्माण होते, सगळेजण आपल्या भावना जोडीदाराला सांगण्यासाठी उत्सुक असतात. पण व्हॅलेंटाईन डे फक्त जोडीदारासोबतच नाही, तर कुटूंबातल्या प्रत्येक जणासोबत साजरा होत असतो.

अशात आईच्या प्रेमापुढे सगळ्यागोष्टी छोट्या वाटतात. आईच्या प्रेमाची आणि तिच्या मायाची तुलना कशाचीही करता येत नाही. आई आपल्या मुलांसाठी काहीही करु याचे उत्तम उदाहरण आता समोर आले आहे.

पडेल ते काम करेल आणि मुलीला शिकवेल असा निर्धार आता एका आईने केला आहे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करत ती आपल्या ८ वर्षाच्या मुलीला सांभाळत आहे.

या महिलेचे नाव सिलविया डी असे आहे. त्या मुळच्या कर्नाटकच्या आहेत. पण दोन वर्षांपासून सिलविया कामाच्या शोधासाठी पुण्यात आल्या आहे. पुण्यात आल्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या, पण त्यांनी खचून न जाता त्यावर मात केली आहे.

सिलविया हाताला मिळेत ते काम करुन आपल्या कुटूंबाचा उदनिर्वाह करत आहे, तसेच त्या त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडताना दिसून येत आहे.

सिलविया यांचे इंग्रजी माध्यमातून एम ए बीएड पर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्यानंतर त्यांनी एका खाजगी शाळेत नोकरी सुरु केली होती, तिने त्यांना कमी वेतन होते. त्यामुळे घरखर्च, मुलीचे शिक्षण या गोष्टींसाठी पैसे पुरत नव्हते. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली.

पुढे त्यांनी स्वता:चा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि मेस सुरु केली. पण कोरोनाच्या संकटात त्यांना ती मेस बंद करावी लागली. त्यानंतर त्यांना खराडीमध्ये बीपीओमध्ये काम मिळाले. पण ते काम रात्रीचे होते आणि त्यांची मुलगी लहान असल्याने तिला घरी एकटे सोडून जाणे शक्य नव्हते, त्यामुळे सिलविया यांना तो जॉब सोडावा लागला.

आता त्या सध्या त्यांनी फुडस्टॉल लावण्याचे काम सुरु केले आहे. ज्या ठिकाणी स्पोर्ट्स सुरु असतात त्या ठिकाणी त्या फुडस्टॉल लावतात. वडगावशेरी, खराडी, कल्याणी नगर, विमानगर, परीसरात त्या हे स्टॉल लावतात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाला सांभाळत आहे, त्यासोबतच आपल्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी ती पार पाडत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.