‘सिलसिला’ चित्रपटासाठी पहीली पसंत होत्या स्मिता पाटील आणि परवीन बाबी; पण अमिताभमूळे रातोरात सगळे बदलले

यश चोप्रा बॉलीवूडच्या सर्वात मोठ्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांचे निर्माण केले आहे. वेळेसोबत चालत आणि प्रेक्षकांच्या मनातलं ओळखत त्यांनी चित्रपटांची निर्मिती केली होती. आजही लोकं त्यांची आठवण काढत असतात.

यश चोप्राने बॉलीवूडमध्ये अनेक लव्ह स्टोरीज बनवल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रेम कहाणीमध्ये काहीतरी वेगळे असायचे. त्यांना प्रेमाची भाषा समजते. म्हणून त्यांनी एवढे सुंदर चित्रपट बनवले आहेत. असे बोलले जाते. अनेक रोमॅंटिक प्रेम कहाण्या त्यांनी बनवल्या आहेत आणि ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले आहेत.

आज यश चोप्रा आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे चित्रपट सदैव आपल्यासोबत असतील. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या ‘सिलसिला’ चित्रपटाविषयी काही रोचक गोष्टी सांगणार आहोत. या चित्रपटातील गाणी आजही लोकांना आवडतात. चित्रपटा अमिताभ, जया आणि रेखा मुख्य भुमिकेत होते. याबद्दलच एक रोचक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अमिताभ बच्चन, रेखा आणि जया स्टारर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला होता. पण चित्रपटाचे गाणे मात्र सुपरहिट होते. आजही लोकं गाणी ऐकत असतात. खुप कमी लोकांना माहीती असेल की, चित्रपटात रेखा आणि जयाच्या जागी स्मिता पाटील आणि परवीन बाबी काम करणार होत्या. पण शेवटच्या चित्रपटाच्या अभिनेत्री बदलण्यात आल्या.

हा चित्रपट विवाहबाह्य संबंधावर आधारित होता. चित्रपटात रेखा आणि जयाची जोडी होती. पण सुरुवातीला यश चोप्राने चित्रपटात स्मिता पाटील आणि परवीन बाबीला घेतले होते. अमिताभला चित्रपटाबद्दल सांगण्यात आले त्यावेळी त्यांनी यश चोप्राला स्टारकास्टबद्दल विचारले.

त्यांनी यश चोप्राला विचारले की, ‘स्मिता, परवीन आणि मी हिच तुमची स्टारकास्ट आहे का सुरुवातीला तर ते शांत बसले. पण नंतर त्यांनी स्वीकारले की, त्यांना चित्रपटामध्ये जया, रेखा अमिताभला घ्यायची इच्छा होती. परंतू त्यांनी दोन्ही अभिनेत्रींना विचारण्याची हिम्मत झाली नाही’.

कारण त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये रेखा आणि अमिताभच्या चर्चा सुरु होत्या. तर दुसरीकडे अमिताभने जयासोबत लग्न केले होते. तरीही त्यांच्या आणि रेखाच्या अफेअरच्या बातम्या येत होत्या. अशाच काही प्रसंगावर सिलसिला चित्रपट होता. म्हणून यश चोप्रा दोन्ही अभिनेत्रींना घाबरत होते.

अशा परिस्थितीमध्ये अमिताभने पुढाकार घेतला. ते मुंबईला आले आणि त्यांना जया व रेखाला सिलसिला चित्रपटासाठी तयार केले. त्यांनी नाही उत्तर दिले होते. पण अमिताभने समजून सांगितल्यानंतर ही गोष्ट शक्य झाली. यश चोप्रा खुप आनंदी झाले. कारण त्यांची ड्रिम कास्ट चित्रपट करत होती.

चित्रपटाची शुटींग सुरु होण्यापूर्वी यश चोप्राने रेखा व जयाकडून वचन घेतले की, त्यांच्या वैयक्तिक आयूष्याचा परिणाम ते चित्रपटावर होऊ देणार नाहीत. दोन्ही अभिनेत्रींनी वचन दिले आणि ते शेवटपर्यंत निभवले देखील. विशेष म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.
महत्वाच्या बातम्या –
जाणून घ्या ‘ऊपर आका नीचे काका’ म्हणीचे रहस्य; काकांच्या नावाने भिक मागायचे भिकारी
‘रंग माझा वेगळा’ मालिकेत नवीन ट्विस्ट, कार्तिकच्या आयुष्यात नवीन मुलीची एंट्री
करिअर फ्लॉप पण बायको मात्र टॉप क्लास; खुपच सुंदर आहेत फ्लॉप अभिनेत्यांच्या बायका; पहा फोटो
सचिन पिळगावकर करतोय लक्ष्याला मिस, सोशल मिडीयावर शेअर केला जुना फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.