याला म्हणतात माणुसकी! शीख सैनिकाने पगडी काढून बांधल्या सहकाऱ्याच्या जखमा

सगळ्यांनाच माहित आहे की शीख धर्मामध्ये पगडीचे किती महत्व आहे. कितीही मोठे संकट आले तरी शीख लोक आपली पगडी काढत नाहीत. पण कधीकधी माणुसकीचा विजय होतो. छत्तीसगढमधील नक्षलवादी हल्ला झाला तेव्हा आपल्या सहकाऱ्याला वाचविण्यासाठी एका शीख सैनिकाने आपली पगडी काढली आणि त्या पगडीच्या कापडाने आपल्या सहकाऱ्याच्या जखमा बांधल्या.

छत्तीसगढमधील बिजापूरजवळील जंगलात नक्षलवाद्यांशी झालेल्या मुठभेडीत २२ जवानांचा मृत्यु झाला. तर अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्याच काळात माणुसकीची अनेक उदाहरणे समोर आली. आयपीएस अधिकारी आर के वीज यांनी दिलेल्या माहितीनुसार एका शीख जवानाने आपल्या सहकाऱ्याला वाचविण्यासाठी पगडी काढून त्याच्या जखमांवर बांधली.

वीज यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली आहे आणि त्या जवानाला सलाम केले आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तो शीख जवान व त्याचा साथिदार दोघेही या हल्यातून बचावले आहेत. केंद्रीय राखीव पोलिस दलातील सब इन्सपेक्टर दीपक भारद्वाज यांनीही अशाच पद्धतीने आपल्या सहकाऱ्याला वाचवले आहे.

भारद्वाज यांच्या पथकाला नक्षलवाद्यांनी घेरले होते आणि त्यांच्यावर जोरदार गोळीबार सुरू केला. भारद्वाज यांनीही अचानक झालेल्या या हल्ल्यात नक्षलवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. याच दरम्यान एका आयईडी बॉम्बचा स्फोट झाला आणि ते शहीद झाले होते.

अशा अनेक माणुसकीच्या घटना आपल्याला पाहायला मिळतील ज्यामध्ये धर्म आडवा येत नाही. या घटना आपल्याला खुप काही शिकवून जातात. दरम्यान, या हल्लानंतर देशातील वातावरण तापलेले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी या नक्षलवाद्यांना सोडणार नाही अशी घोषणा केली आहे. त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल असेही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या
जेलची हवा खायची नसेल तर गुगलवर या गोष्टी कधीच सर्च करू नका
पंख्याला तीन पाती का असतात? जाणून घ्या यामागचे कारण..
भाजपला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता अजित पवारांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश  

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.