सक्तीने निवृत्त केलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचा मोदी सरकारला टोला, घराबाहेर लावला ‘हा’ फलक

कानपुर | उत्तर प्रदेशमधील १९९२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांचा कार्यकाळ २०२८ मध्ये पुर्ण होणार होतात. त्याआधीच त्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून लोकहितासाठी सेवानिवृत्त करण्यात आलं आहे.

अमिताभ ठाकूर यांचा कार्यकाळ पुर्ण होण्याआधीच त्यांना निवृत्त करण्यात आल्याने मोदी सरकारवर ठाकूर नाराज झाले आहे. आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांनी त्यांच्या लखनऊमधील गोमती नगर येथील निवास्थानाच्या गेटवर फलक लावला आहे. त्यावर अमिताभ ठाकूर आयपीएस ‘जबरिया रिटायर्ड’ असं नमुद केलं आहे.

अमिताभ ठाकूर यांनी ट्विट करत फोटो शेअर केला आहे. सोशल मिडियावर त्यांची पोस्ट व्हायरल होत आहे. आयपीएस अधिकाऱ्याला मोदी सरकारने जबरदस्तीने निवृत्त केल्याने या प्रकरणाची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.

अमिताभ ठाकूर यांच्यासह उत्तर प्रदेशमधील दोन आयपीएस अधिकाऱ्यांना निवृत्त करण्यात आले आहे. योगी सरकारने राजेश कृष्ण आणि राकेश शंकर या दोन आयपीएस अधिकाऱ्यांना सेवा निवृत्त केले आहे.

अमिताभ ठाकूर नेहमी वादात सापडले आहेत. त्यांनी समाजवादी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने ठाकूर यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत घेतले होते.

कोण आहेत अमिताभ ठाकूर

अमिताभ ठाकूर यांनी योगी सरकारच्या कारभारावर नेहमी टीका केली आहे. सध्या ते सहसंघचालक पदावर कार्यरत होते. त्यांचा कार्यकाळ २०२८ मध्ये पुर्ण होणार होता. उत्तर प्रदेशमधील सरकारी अधिकारी, नेते यांच्यावर अमिताभ ठाकूरांनी अनेक आरोप केले होते.

दरम्यान गृहमंत्रालयाने सेवा निवृत्त केल्याने अमिताभ ठाकूर यांनी ट्विट करत म्हटलं की, मला आताच वीआरएस (लोकहित सेवानिवृत्ती) आदेश मिळाला आहे. सरकारला माझ्या सेवेची गरज नाही. जय हिन्द! असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
रश्मी शुक्लांनी भाजपात जाण्यासाठी माझ्यावर दबाव आणला; राजेंद्र पाटील यड्रावकरांचा खुलासा
बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करुन हेमा मालिनीने फेडले होते कर्ज; जाणून घ्या पुर्ण प्रकरण
एसीबीचे अधिकारी घरावर धाड टाकायला आले, अन् लाचखोर तहसीलदाराने जाळल्या २० लाखांच्या नोटा
“भाजप बरोबर राहण्यासाठी पोलिस अधिकारी रश्मी शुक्लांनी ‘या’ आमदाराला धमकावलं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.