प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाचा पोलीस सध्या जोरदार तपास करत आहेत. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला(Sidhu Musevala) यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्यावेळी नेमकं काय घडलं? याबाबतचा खुलासा त्याच्या एका मित्राने केला आहे. (sidhu musevala friend give big explaniation)
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्यावेळी त्याचा मित्र गुरविंदर सिंग देखील कारमध्ये हजर होता. गुरविंदर सिंगने या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे. “मी सिद्धू मुसेवाला याला बुलेटप्रूफ गाडीत बसण्यास सांगितले होते. पण त्याने माझे म्हणणे ऐकले नाही. त्याने थार गाडीमधून जाणार असल्याचे मला सांगितले”, अशी माहिती गुरविंदर सिंग यांनी दिली आहे.
सिद्धू मुसेवाला याचा मित्र गुरविंदर सिंगने सांगितले की, “सिद्धू मुसेवाला याच्यावर हल्ला झाला त्यावेळी थार गाडीमध्ये एकूण तीन लोक हजर होते. सिद्धू मुसेवाला याला बुलेटप्रूफ गाडीत बसण्यास मी सांगितले. पण त्याने मला नकार दिला आणि थार गाडीमधून जाणार असल्याचे सांगितले. हल्ल्यापूर्वी सिद्धूने गाडीमध्ये ‘उठेगा जवानी विच जनाजा मिठीये’ हे गाणे वाजवले होते.”
सिद्धू मुसेवाला याच्यावर हल्ला झाला त्यावेळी गुरविंदर सिंग देखील त्या ठिकाणी हजर होता. या हल्ल्यात तो देखील जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ‘उठेगा जवानी विच जनाजा मिठीये’ हे गाणे सिद्धू मुसेवालाचेच आहे. त्याने हे गाणे गायले आहे. काही दिवसांपूर्वी ‘द लास्ट राइड’ या नावाने हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते.
पंजाबमधील मानसा जिल्ह्यात २९ मे २०२२ रोजी पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी बिष्णोई गॅंग आणि गोल्डी ब्रार टोळीने स्वीकारली होती. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात सध्या पोलिसांना मोठा सुगावा लागला आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात सहभागी झालेल्या आठ शूटर्सची ओळख पटली आहे.
या आठ पैकी एक शूटरला पोलिसांनी पंजाबमधून अटक केली आहे. आता पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन देखील समोर आले आहे. महाराष्ट्रातील पुण्यामधील दोन शूटर्सचा पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमध्ये सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ अशी या दोन शूटर्सची नावे आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा करत विवेक अग्निहोत्री यांचा शिवसेनेला टोला, म्हणाले….
मला मुद्दाम सचिनला चेंडूने जखमी करायचे होते कारण…, शोएब अख्तरने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा
जॉनी डेपने घेतला लंडनमधील भारतीय हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद, दिली ४९ लाखांची टीप