Share

बर्थडे पार्टीचे बिल मागितल्याने संतापला शिंदेगटातील आमदारपुत्र; थेट हातपाय तोडण्याची धमकी दिली

औरंगाबाद : वाढदिवसाच्या पार्टीचे बिल मागणाऱ्या केटरिंग व्यावसायिकाला एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाने शिवीगाळ केली आहे. तसेच त्याने केटरींग व्यावसायिकाला हातपाय तोडण्याची धमकी देखील दिली आहे. त्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

काही दिवसांपुर्वी आमदार संजय शिरसाठ आणि त्यांचे पुत्र सिद्धांत शिरसाठ यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे केटरिंग चालकाचे 20 हजार रुपये देणे बाकी होते. त्यासाठी केटरिंग चालकाने सिद्धांत शिरसाठ यांना पैसे मागण्यासाठी फोन केला होता.

त्यावेळी, ऑडिओ क्लिपमध्ये मदार संजय शिरसाठ यांचे पुत्र सिद्धांत शिरसाठ त्या केटरींगचालकाला धमकी देताना दिसत आहेत. ते म्हणत आहेत की पुन्हा बिलासाठी कार्यालयात आल्यास तुझे हातपाय तोडून टाकू. दे अशी उघड धमकी देत ​​असल्याचे दिसून आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

केटरिंग चालक आणि सिद्धांत शिरसाठ यांच्यात संवाद जसाच्या तसा
सिद्धांत शिरसाठ : बोला
केटरिंग चालक : आमदारसाहेबांसोबत बोलणी झालं त्यावेळी ४० हजार ठरलं होतं. पण बाहेर आल्यावर मला २० हजार रुपयेच दिले आहेत.
सिद्धांत शिरसाठ : साहेबांनी जेवढे सांगितले होते, तेवढेच दिले. विषय संपला आता.
केटरिंग चालक : भाऊ अजून वीस हजार रुपये बाकी आहे ना भाऊ…

सिद्धांत शिरसाठ : मूड खराब करायचा नाही हं आता…
केटरिंग चालक : भाऊ कामाचे पैसे तुमच्याकडे बाकी आहेत, असं नका ना करू. तुमच्या एका शब्दावर तुमचे ७५ हजार रुपये कमी केले.
सिद्धांत शिरसाठ : उपकार केले ना तू.
केटरिंग चालक : भाऊ तशी नका भाषा वापरू. तेवढे कामाचे पैसे देऊन टाका.

सिद्धांत शिरसाठ : कोणत्या कामाचे पैसे….
केटरिंग चालक : त्याच कामाचे. तसे एक लाख २५ हजार रुपये होते. पण तुमच्या शब्दावर ७५ हजार रुपये डिस्काउंट केले.
सिद्धांत शिरसाठ : तू ना आता जरा त्याच्यावर वरच झाला. साहेबांसमोर तुला वीस हजार रुपये दिले.
केटरिंग चालक : साहेबांनी ४० हजार रुपये देण्याचे कबूल केले हेाते. पण बाहेर आल्यावर माझ्या हातावर वीसच हजार रुपये देण्यात आले.

सिद्धांत शिरसाठ : मग, तू का नाही त्यावेळी बोलला.
केटरिंग चालक : बरं, परत यायला लागेल ऑफीसला. मग आता काय करणार…
सिद्धांत शिरसाठ : ऑफीसला परत आला तर तुझे हातपायच तोडतो बेट्या…
केटरिंग चालक : भाऊ असं नका ना बोलू तुम्ही…

सिद्धांत शिरसाठ : असं नका बोलू म्हणजे…
केटरिंग चालक : कामाचे पैसे तेवढे देऊन टाका ना. तुम्हाला घाबरायचे पैसे मागतोय का.
सिद्धांत शिरसाठ : कुणाचं देणं आहे… रे. कुठाय तू आता…
केटरिंग चालक : घरी होतो.
सिद्धांत शिरसाठ : थांब येतो तिथं.

https://twitter.com/Satish_Daud/status/1609097868803211264?s=20&t=CsdAnf0mLBz8_ck9ZY1RJA

याबाबत सिद्धांत सिरसाट यांना विचारलं असता, सदरील व्यावसायिक हा सात वर्षानंतर ब्लॅकमेलिंग करीत पैसे मागत असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. पण आता या धमकीनंतर पोलिस काही कारवाई करतात हे पाहावे लागेल.

महत्वाच्या बातम्या
shivsena : शिंदे गट सोडण्याच्या चर्चेवर नाराज शिरसाट यांनी मौन सोडलं; केल खळबळजनक वक्तव्य, वाचा काय म्हंटलंय?
ajit pawar..तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील का? अजित पवार भरसभागृहात भडकले
shivsena : ठाकरेंच्या शिवसेनेला आणि मनसेला एकनाथ शिंदेंनी पाडले खिंडार, बालेकिल्लाच ताब्यात घेण्याच्या तयारीत 

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now